वर्धापनदिनी कॉंग्रेस देणार १३५ वर्षांच्या इतिहासाला उजाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:10 AM2020-12-22T04:10:49+5:302020-12-22T04:10:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कॉंग्रेसच्या २८ डिसेंबरच्या १३५ व्या वर्धापनदिनानिमित्त एका खास ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून उजाळा देण्याचा निर्णय पक्षाच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कॉंग्रेसच्या २८ डिसेंबरच्या १३५ व्या वर्धापनदिनानिमित्त एका खास ध्वनीचित्रफितीच्या माध्यमातून उजाळा देण्याचा निर्णय पक्षाच्या शहर शाखेने घेतला आहे. पक्षाच्या विविध ऐतिहासिक घडामोडींच्या दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनही यावेळी भरविण्यात येणार आहे.
शहर कॉंग्रेसच्या वतीने दरवर्षी वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात येतो. यावर्षी शहराध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश सरचिटणीस मोहन जोशी, अॅड. अभय छाजेड यांच्या प्रयत्नातून विशेष कार्यक्रम होत आहे. पक्षाच्या दीर्घ इतिहासाला उजाळा देणारी ध्वनीचित्रफित या निमित्ताने सादर केली जाणार आहे.
शहर सरचिटणीस रमेश अय्यर व नगरसेवक अजित दरेकर यांनी सांगितले की शहराच्या वेगवेगळ्या भागात ध्वनिचित्रफितीचे सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यात पंडित नेहरूंपासून ते सोनिया गांधी यांच्यापर्यंतच्या पक्षाध्यक्षांच्या कारकिर्दीतील विशेष घडामोडींची माहिती आहे. पक्षाच्या वाटचालीची छायाचित्रांमधून माहिती देणारे प्रदर्शन छाजेड यांच्या संग्रही आहे. त्याचे २६ डिसेंबरपासून काँग्रेसभवमध्ये लोकांसाठी खुले केले जाणार आहे.