वडगावशेरीमध्ये महागाईविरोधात काँग्रेसची निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:08 AM2021-07-18T04:08:48+5:302021-07-18T04:08:48+5:30
रवींद्र उकरंडे म्हणाले, काही दिवांसापासून इंधन दरवाढीबरोबरच महागाईदेखील वाढू लागली आहे. इंधनाच्या करातून मोदी सरकाने २५ लाख कोटी रुपयांची ...
रवींद्र उकरंडे म्हणाले, काही दिवांसापासून इंधन दरवाढीबरोबरच महागाईदेखील वाढू लागली आहे. इंधनाच्या करातून मोदी सरकाने २५ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. हा पैसा देशातील जनतेच्या हितासाठी किंवा राज्य सरकारसाठी वापरला जात नाही, असा आरोप करून १९ तारखेपासून सुरू होत असलेल्या संसदेच्या अधिवेशनात काँग्रेसचे नेते मोदी सरकारला इंधन दरवाढ व महागाईप्रश्नी जाब विचारतील असेही ते म्हणाले.
करीम शेख म्हणाले की, डाळीच्या किमती मागील वर्षाच्या तुलनेत १२.७२ टक्क्यांनी वाढल्या आहेत. सूर्यफूल तेल ५६.३१ टक्क्यांनी तर सोयातेल ५२.६६ टक्क्यांनी महाग झाले आहे. या भाववाढीचा फटका लोकांना बसत आहे. पण, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही. मोदी सरकारच्या या अन्यायी कारभाराचा फटका सामान्य जनतेला बसत असून महागाईने सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे.
डॉ. मनमोहनसिंग सरकारच्या काळात २७.१ कोटी लोकांना गरिबी रेषेच्यावर आणले होते. मात्र मागील वर्षी २३ कोटी लोक गरिबी रेषेच्या खाली ढकलेले गेले आहेत. बेरोजगारीचे प्रमाणही वाढले असल्याचेही त्यांनी सांगितले.
१७ चंदननगर
वडगावशेरीतील टाटा गार्डरूम येथे महागाई विरोधात निदर्शने करताना काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते.