पुण्यातील काँग्रेस भवनाला लागले टाळे; विद्यमान पदाधिकाऱ्यांचा टाळे लावण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 03:36 PM2017-09-07T15:36:37+5:302017-09-07T15:37:14+5:30
कार्यकर्त्यांच्या गर्दीने एकेकाळी गजबजून जाणाऱ्या काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळं लावण्यात आलं आहे.
पुणे, दि. 7- कार्यकर्त्यांच्या गर्दीने एकेकाळी गजबजून जाणाऱ्या काँग्रेस भवनच्या मुख्य प्रवेशद्वाराला टाळं लावण्यात आलं आहे. गर्दीने त्रस्त होऊन विद्यमान पदाधिकाऱ्यांनीच टाळं लावण्याचा हा घेतला आहे. पण कार्यालयातील व्यक्तींना त्रास होणारी ही गर्दी कार्यकरत्यांची नाही तर वाहन धारकांची आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात भलं मोठं मैदान असलेली सार्वजनिक स्वरूपाची ही एकमेव वास्तू आहे. त्यामुळे अनेकजण आपले चारचाकी वाहन निर्धास्तपणे लावून खरेदीसाठी म्हणून लक्ष्मी रोडला जातात. त्याचाच कार्यालयातील लोकांना त्रास होत असल्याची चर्चा सुरू आहे. काही जणांनी तर ही जागा म्हणजे त्यांचं खासगी पार्किंगच बनवलं आहे. त्यालाच वैतागून शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी मुख्य प्रवेशद्वाराला टाळं लावण्याचा निर्णय घेतला अशी माहिती शहर सरचिटणीस रमेश अय्यर यांनी दिली. मात्र त्यामुळे आता भवनात पक्षाच्या कामासाठी म्हणून येणाऱ्यांना या व्यवस्थेचा त्रास होऊ लागला आहे.