गुंजवणीच्या उपसा सिंचन योजनेचे श्रेय काँग्रेसने घेऊ नये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:14 AM2021-08-19T04:14:45+5:302021-08-19T04:14:45+5:30
वेल्हे तालुक्यात गुंजवणी धरणाच्या पाणी तालुक्यातील जनतेला मिळावे यासाठी सर्व पक्षीय गुंजवणी पाणी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या ...
वेल्हे तालुक्यात गुंजवणी धरणाच्या पाणी तालुक्यातील जनतेला मिळावे यासाठी सर्व पक्षीय गुंजवणी पाणी संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. या संघर्ष समितीच्या माध्यमातून गुंजवणीच्या पाण्याचा लढा सुरू करण्यात आला. वेल्हे तालुक्यातील वाजेघर व वांगणी खोऱ्यासाठी उपसा योजनेसाठी प्रयत्न सुरू केले व त्या प्रयत्नांना खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी तत्वत: मंजुरी देऊन हिरवा कंदील दाखविला आहे. आज वाजेघर व वांगणी उपसा योजनेच्या सर्वेक्षणाचा शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, या कार्यक्रमाचे सोशल मीडियावर पोस्टर्स फिरताना दिसत आहे. यामध्ये काॅंग्रेसकडून हे काम झाले असल्याची जाहिरात केली जात आहे. या जाहिरातीस वेल्हे राष्ट्रवादी काॅंग्रेसने आक्षेप घेतला असून गुंजवणी वाजेघर व वांगणी उपसा सिंचन योजनेस आमचा विरोध नाही. या योजनेस तत्वत: मान्यता मिळाली हे यश गुंजवणी संघर्ष समितीचे यश आहे. याचे श्रेय एकट्या काॅंग्रेस पक्षाने घेऊ नये, असेही रेणुसे यांनी सांगितले. या वेळी माजी तालुका अध्यक्ष तानाजी मांगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उपाध्यक्ष किरण राऊत, युवक अध्यक्ष प्रमोद लोहकरे, युवक कार्याध्यक्ष संदीप खुटवड, बारामती लोकसभा मतदार संघाचे युवक कार्याध्यक्ष नंदू रसाळ उपस्थित होते.