नगर परिषद, जिल्हा परिषदेच्या निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:11 AM2021-09-13T04:11:18+5:302021-09-13T04:11:18+5:30
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या सूचनेनुसार पक्षाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय ...
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने प्रदेश अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या सूचनेनुसार पक्षाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार संजय जगताप, संग्राम मोहोळ, महेश ढमढेरे, पृथ्वीराज पाटील, लहू निवंगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड नगर परिषद, जिल्हा परिषद, दौंड पंचायत समिती निवडणूक काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार आहे. दौंड तालुका काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयारी करावी. पक्ष सर्व शक्तीनिशी निवडणुकीत उतरणार असल्याचे विठ्ठल दोरगे यांनी सांगितले. याबाबत दिलेल्या प्रसिद्धीपत्रकावर अध्यक्ष विठ्ठल दोरगे, दौंड शहर काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष महेश जगदाळे, दौंड शहर महासचिव प्रकाश सोनवणे यांच्या सह्या आहेत.
चौकट :-
देशात वाढलेली महागाई, बिघडलेले आर्थिक गणित यात सर्वसामान्य जनता होरपळून निघत असताना भाजपा व मोदी सरकारला याचे घेणेदेणे नाही. लहान-मोठे व्यापारी मोठ्या अडचणींतून जात आहेत. शेतकरी वर्ग तर मेटाकुटीला आला आहे. अशात देशात परत एकदा काँग्रेस पक्षाशिवाय कोणताही पर्याय सर्वसामान्य जनतेला राहिलेला नाही. दौंड तालुक्यात आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनतेला सुवर्णकाळ आणण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी विठ्ठल दोरगे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
120921\20210911_145535.jpg
विठ्ठल दोरगे