२३ गावांच्या विकासासाठी काँग्रेस मोहीम राबविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:09 AM2021-07-05T04:09:15+5:302021-07-05T04:09:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासाकडे काँग्रेस पक्षाचे लक्ष असून लवकरच पक्षाकडून मोहीम हाती ...

Congress will launch a campaign for the development of 23 villages | २३ गावांच्या विकासासाठी काँग्रेस मोहीम राबविणार

२३ गावांच्या विकासासाठी काँग्रेस मोहीम राबविणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांच्या विकासाकडे काँग्रेस पक्षाचे लक्ष असून लवकरच पक्षाकडून मोहीम हाती घेतली जाईल. ही गावे बकाल होऊ देणार नाही, असे प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी जाहीर केले आहे.

मोठ्या शहरांच्या नियोजनबद्ध विकासासाठी काँग्रेस पक्ष सातत्याने आग्रही राहिला आहे. केंद्रामध्ये मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकारने जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण योजना ठोसपणे राबविली होती. सांडपाणी निचरा प्रकल्प, प्रशस्त रस्ते, नदी सुधारणा अशा मूलभूत विकासकामांसाठी हजारो कोटींचा निधी काँग्रेस सरकारने उपलब्ध करून दिला होता. कॉंग्रेस पक्षाचे शहर विकासाचे धोरण राबवून पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या २३ गावांकडे लक्ष ठेवून तेथील समस्या सोडविणे, विकासकामांसाठी राज्य शासनाकडून निधी उपलब्ध करून देणे याकरिता मोहीम आखून काँग्रेस पक्ष पाठपुरावा करेल, असे मोहन जोशी यांनी पत्रकात म्हटले आहे.

२३ गावांतील पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जातील. आगामी निवडणुकीची व्यूहरचना केली जाईल, असे मोहन जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: Congress will launch a campaign for the development of 23 villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.