राजीव गांधींना काँग्रेसजनांचे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:10 AM2021-05-22T04:10:04+5:302021-05-22T04:10:04+5:30
पुणे : राजीव गांधी हे आधुनिक भारताचे खरे शिल्पकार आहेत, अशा शब्दांत काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. दिवंगत माजी ...
पुणे : राजीव गांधी हे आधुनिक भारताचे खरे शिल्पकार आहेत, अशा शब्दांत काँग्रेसच्या वतीने अभिवादन करण्यात आले. दिवंगत माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची शुक्रवारी ३० व्या पुण्यतिथीनिमित्त काँग्रेस भवन तसेच कात्रज येथील त्यांच्या पुतळ्यास फुलांचा हार अर्पण करण्यात आला.
राजीव गांधी स्मारक समितीने कात्रज येथील पुतळ्याजवळ आयोजित केलेल्या कार्यक्रमाला आमदार संग्राम थोपटे, संजय जगताप, समितीचे संस्थापक, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी तसेच काँग्रेसचे अन्य, पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
महिला अध्यक्षा सोनाली मारणे, राजीव जगताप, किशोर रायकर, रमेश सोनकांबळे, संग्राम मोहोळ, महेश बापू ढमढेरे, सूर्यकांत मारणे, लक्ष्मण आबा तरवडे, पृथ्वीराज पाटील, अविनाश गोडबोले, आबा जगताप, संजय अभंग, हरिदास अडसूळ, घनश्याम निम्हण, महेश अंबिके, नरसिंह अंदोली यावेळी उपस्थित होते. सूर्यकांत मारणे यांंनी आभार व्यक्त केले.
काँग्रेस भवनमध्ये प्रदेश सरचिटणीस अँड. अभय छाजेड यांनी राजीव यांच्या आठवणींना उजाळा दिला.
राजीव यांच्या दूरदृष्टीमुळेच भारतात संगणक क्रांती झाली. भारताने जगातील इतर देशांप्रमाणे विज्ञान-तंत्रज्ञानमध्ये प्रगती केली त्याचे कारणच राजीव गांधी आहेत, असे छाजेड म्हणाले. प्रदेश चिटणीस संजय बालगुडे यांचेही भाषण झाले.
तौक्ते वादळामुळे मृत्युमुखी पावलेल्या नागरिकांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. कमल व्यवहारे, विशाल मलके, साहिल केदारी, यासीन शेख, नगरसेवक रफिक शेख, सुजाता शेट्टी, रमेश सोनकांबळे, मुन्नाभाई शेख, चेतन गरवाल, हरिदास अडसूळ, बाबा नायडू, अविनाश अडसूळ, मनोहर गाडेकर, सुनील वस्ते, भगवान कडू यावेळी उपस्थित होते. नगरसेवक अविनाश बागवे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. लता राजगुरू यांनी आभार व्यक्त केले.