काँग्रेसचा मोर्चा शांततेत, सरकारचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 02:25 AM2018-01-28T02:25:31+5:302018-01-28T02:25:54+5:30
थे दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा शासनाच्या विरोधात शहरातून काढण्यात आलेला मोर्चा शांततेत झाला. या वेळी काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करून निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले.
दौंड - येथे दौंड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भाजपा शासनाच्या विरोधात शहरातून काढण्यात आलेला मोर्चा शांततेत झाला. या वेळी काँग्रेसच्या वतीने भाजपा सरकारचा निषेध करून निवेदन तहसीलदार बालाजी सोमवंशी यांना देण्यात आले.
भाजपा सरकारने जनतेला व देशाला फसवले आहे. हे शासन जाहिरातबाज सरकार असून परदेशातील काळा पैसा आणून प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख देऊ तो दिला नाही उलट नोटा बंदीत काळा पैसा पांढरा केला. हे सरकार बड्या १०० उद्योजकांचे आहे कारण २०१४ साठी २ कोटी १४ लाख हजार कर्ज माफ केले.
२०१७ ला पूर्ण ८५ हजार
कोटी बँकांना दिले. शेतकºयाची कर्जमाफी फसवी, स्वाभिमानी आयोग लागू केला नाही. शेतकºयांचा शेतीमाल बाजारभाव नाहीत. योजना कागदावर शेतकरी आत्महत्या करीत आहे. या निवेदनावर दौैंड तालुका काँग्रेसचे अध्यक्ष पोपट ताकवणे, शहराध्यक्ष बाबा शेख, महिला अध्यक्षा मालन दोरगे, अतुल जगदाळे, अशोक फरगडे, अशोक जगदाळे, आप्पासाहेब अवचर, दादा निंबाळकर, संपत फडके, रफिक शेख, तन्मय पवार, अल्ताब शेख, हरिश ओझा, धनाजी ताकवणे यांच्यासह मान्यवरांच्या सह्या आहेत.
- मोदी पंतप्रधान झाल्यापासून सर्व उद्घाटने काँग्रेसने केलेल्या कामाची केली आहेत. काँग्रेसने सर्व योजनांची नावे बदलू आरएसएस, भाजपाची नावे दिली आहेत. त्यांनी स्वातंत्र्याचा काळात साथ दिली भारताच्या स्वातंत्र्याशी काहीही संबंध नाही.
- कोणत्याही घटक जातीधर्माच्या जनतेला आरक्षण दिले नाही. फक्त २ टक्के ठराविक समाजाला गुजरातला झुकते माप दिले. पेट्रोल, डिझेल, गॅस भाव भडकले आहेत. त्याचप्रमाणे छोटे लघु व्यवसाय उद्योग बंद पडले. दुधाला भाव नाही. देशात सर्व घटक रस्त्यावर येऊन मोर्चा काढत आहेत. यासह अन्य घटनाचा उल्लेख निवेदनात केला आहे.