'हाय प्रोफाइल महिलांशी सेक्ससाठी जोडून देतो', सांगत सिरीयलच्या 'या' लेखकाने घातला अनेकांना गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 09:19 PM2022-02-22T21:19:05+5:302022-02-22T21:19:13+5:30

फ्रेंडशिप क्लबच्या नावाने उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविण्याचे दाखवले आमिष

Connects with high profile women for sex said a serial writer after fraud 250 people | 'हाय प्रोफाइल महिलांशी सेक्ससाठी जोडून देतो', सांगत सिरीयलच्या 'या' लेखकाने घातला अनेकांना गंडा

'हाय प्रोफाइल महिलांशी सेक्ससाठी जोडून देतो', सांगत सिरीयलच्या 'या' लेखकाने घातला अनेकांना गंडा

Next

पुणे : फ्रेंडशिप क्लबच्या नावाने उच्चभ्रु महिलांना सेक्ससाठी पुरविण्याचे आमिष दाखवून सुमारे २५० जणांना गंडा घालणारा मुख्य सुत्रधार हा एका वृत्तवाहिनीत मालिकाचे लेखन करीत असल्याचे सायबर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. अनुप सुकलाल मनोरे (वय ३५, रा. मोहम्मदवाडी) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने लोकांची फसवणूक करण्याकरीता गणेश शेलार असे बनावट नाव धारण केले होते. गेल्या १० वर्षांपासून तो हाय प्रोफाइल महिलांशी सेक्ससाठी जोडून देतो, असे सांगून फसवत असल्याचे उघड झाले आहे. मिनाक्षी फ्रेंडशिप क्लब या नावाने तो ही फसवणूक करीत होता.

याबाबत सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक संगीता माळी यांनी सांगितले की, अनुप मनोरे याला अटक केली. त्यावेळी त्याच्याकडे असलेली डायरी जप्त केली आहे. त्यात फसवणूक केलेल्या सुमारे २५० जणांची यादी आहे. त्यात त्याने नावासमोर त्यांच्याकडून किती पैसे घेतले हे लिहून ठेवले आहे. २०१० पासून तो हा प्रकार करत होता. त्यात पुण्यासह राज्यभरातील विविध शहरातील लोकांचा समावेश आहे. मात्र, आतापर्यंत तक्रार देण्यासाठी कोणी पुढे आले नव्हते.

'एंजॉय करा आणि हजारो रुपये कमवा' मीनाक्षी फ्रेंडशिप क्लब या नावाने तो जाहिरात करीत असे. महिलांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांची कागदपत्रे घेऊन त्यांच्या नावावर सीम कार्ड घेतले व त्यांच्या नावाने बँक खाते उघडण्यास लावत असे. एका व्यावसायिकाला क्लब हा श्रीमंत हाय प्रोफाईल लेडीज सोबत सेक्स करण्यासंदर्भात असून त्याबद्दल भरपूर पैसे मिळतील, असे सांगण्यात आले. वेगवेगळी कारणे सांगून त्यांच्याकडून एकूण ६० लाख २० हजार रुपये उकळले. या गुन्ह्याचा तपासात हा सर्व प्रकार समोर आला आहे.

अशा प्रकारे सेक्ससाठी महिला पुरविण्याचे आमिष दाखवून अनुप मनोरे यांने अनेकांची फसवणूक केली आहे. फसवणूक झालेल्यांनी सायबर पोलिसांशी संपर्क साधावा, त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात येईल, असे आवाहन पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी केले आहे.

अनुप मनोरे हा एक लेखक 

अनुप मनोरे हा एक लेखक आहे. त्याची मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंताबरोबर ओळख होती. त्याने हिंदी रंगभूमीवरील शेक्यपियरच्या कॉमेडी ऑफ एरर्स या नाटकावर आधारित रंग रसिया या नाटकात काम केले होते.

 सिरियलच्या लेखकाने प्रत्येक एंट्रीसाठी देत होता ५ हजार रुपये

अनुप मनोरे हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील चोपडा या गावातील राहणारा आहे. त्याने महिलांना नोकरी देण्याचे आमिष दाखवून त्यांना बँक खाते उघडायला लावले. तो फसवणूक करीत असलेल्या लोकांकडून या महिलांच्या बँक खात्यात पैसे मागवीत. पैसे आले की ते काढण्यास या महिलांना सांगत. त्यासाठी या महिलांना प्रत्येक वेळी ५ हजार रुपये देत असत. मनोरे याने यातून मिळालेल्या पैशामधून रायगड जिल्ह्यात जमीन घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील काही लोकांना यातील रक्कम दिली आहे, त्याचा तपास करायचा असल्याचे सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी सांगितले. न्यायालयाने अधिक तपासासाठी त्याला २४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

Web Title: Connects with high profile women for sex said a serial writer after fraud 250 people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.