गडकिल्यांचे संवर्धन हीच शिवभक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:22 AM2021-01-13T04:22:02+5:302021-01-13T04:22:02+5:30
पुणे : “राज्यातील गडकिल्ले हा आपल्या परंपरेचा एक ऐतिहासिक ठेवा आहे. आज तरूणाई मोठ्या प्रमाणावर दुर्गसंवर्धनात काम करते, मात्र ...
पुणे : “राज्यातील गडकिल्ले हा आपल्या परंपरेचा एक ऐतिहासिक ठेवा आहे. आज तरूणाई मोठ्या प्रमाणावर दुर्गसंवर्धनात काम करते, मात्र या कार्याला एक व्यापक स्वरूप यायला हवे, महाराजांच्या विचारांचा प्रसार, गडकिल्ल्यांवरील स्वच्छता व संवर्धन हीच खरी शिवभक्ती” असे मत कर्जत-जामखेड येथील आमदार रोहित पवार यांनी वय्क्त केले.
सृजन आयोजित राज्यस्तरीय दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेचा पारितोषीक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. दुर्ग अभ्यासक व लेखक रामनाथ आंबेरकर, संवर्धन अभ्यासक मृदूला माने तसेच ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई व प्रकाश अकोलकर, स्पर्धेचे परिक्षक प्रमोद बोऱ्हाडे आदी यावेळी उपस्थित होते.
“दुर्गराज गडकिल्ले बांधणी स्पर्धेत राज्यभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतला. परंतु आपल्याला स्पर्धेपुरतेच न थांबता गडकिल्ल्यांच्यी आजची दुरवस्था मिटवून टाकण्यासाठी व्यापक चळवळ हाती घ्यायला हवी. गडकिल्ले बांधणी स्पर्धा प्रत्येक स्तरातून आयोजित करून आपली परंपरा जपायला हवी,” असे रोहित पवार म्हणाले. “गडकिल्ल्यांच्या माध्यमातून अँडव्हेन्चर इन्स्टिट्यूट सुरु करायला हवी. मॉडर्न टेक्नॉलॉजी आत्मसात करून किल्ले पर्यटनात व्हर्चुअल रिअँलीटीचा अवलंब करायला हवा, राज्यातील महत्वाच्या पाच किल्ल्यांना वर्ल्ड हेरिटेजचा दर्जा द्यायला हवा व किल्ल्यांचे शास्त्रोक्त डॉक्युमेंटेशन व्हायला हवे,” असे पवार यावेळी म्हणाले.
राज्यभरातून १० हजारहून अधिक स्पर्धकांनी, तर ३०० मित्र मंडळं स्पर्धेत सहभागी झाली होती. स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे : मुक्तछंद - दुर्गामाता मित्र मंडळ- प्रथम (पुणे) शुभम लांडगे- द्वितीय (पुणे), शंकर नागार - तृतीय (पेण-रायगड)
मुख्य स्पर्धा - किल्लेदार प्रतिष्ठान- प्रथम (नागपूर), शिवप्रताप ग्रुप- द्वितीय (नागपूर), भैरवनाथ तरूण मंडळ- तृतीय (पुणे-लोणावळा)