उत्तम आरोग्यासाठी पिंपळाच्या झाडाचे संवर्धन महत्त्वाचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:08 AM2021-05-28T04:08:10+5:302021-05-28T04:08:10+5:30

खोडद : गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली. तेव्हापासूनच पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. ...

Conservation of Pimple tree is important for good health | उत्तम आरोग्यासाठी पिंपळाच्या झाडाचे संवर्धन महत्त्वाचे

उत्तम आरोग्यासाठी पिंपळाच्या झाडाचे संवर्धन महत्त्वाचे

खोडद : गौतम बुद्धांना पिंपळाच्या झाडाखाली ज्ञानप्राप्ती झाली. तेव्हापासूनच पिंपळाच्या झाडाला बोधिवृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष म्हणून ओळखले जाऊ लागले. आजच्या कोरोनाच्या या कठीण काळात प्रत्येकाने हा ज्ञानाचा वृक्ष आपल्या उत्तम आरोग्यासाठी संवर्धन करणे काळाची गरज आहे. कारण कायम प्राणवायू देणारा हा एकमेव वृक्ष असल्याचे प्रतिपादन ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश घोडके यांनी केले.

बुद्धपौर्णिमेचे औचित्य साधून ओतूर वनपरिक्षेत्र कार्यालयाच्यावतीने उदापूर येथे वन जमिनीत पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा असलेल्या पिंपळ वृक्षाची लागवड करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या वेळी सहाय्यक वनसंरक्षक ए. एल. भिसे, आळे गावचे वनपाल एस. के. साळुंके, मढचे वनपाल आर. डी. गवांदे, के. एफ. खरोदे, एस. ए. राठोड, वनमजूर एस. गुंफेकर व वन विभागाचे अन्य कर्मचारी उपस्थित होते.

घोडके पुढे म्हणाले की, अवघ्या विश्वाला शांततेचा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या तथागत गौतम बुद्धांचा जन्म, बुद्धांना ज्ञानप्राप्ती आणि बुद्धांचे महापरिनिर्वाण या तिन्हीही महत्त्वपूर्ण घटना वैशाख पौर्णिमेच्या दिवशी घडल्या. पिंपळ हा कायम ऑक्सिजन देणारा वृक्ष असल्याने पर्यावरणाच्या दृष्टीने पिंपळ हे अत्यंत महत्त्वाचे झाड आहे. पिंपळाच्या झाडावर अनेक प्रकारचे जीव देखील राहतात. पिंपळ हा पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचा वृक्ष आहे.

ओतूर वनपरिक्षेत्र विभागाने उदापूर येथील वन जमिनीत पिंपळ वृक्षांची लागवड केली आहे. लागवड केलेल्या या पिंपळाच्या झाडांसाठी पाण्याची व्यवस्था देखील करण्यात आली आहे.

२७ खोडद

ओतूर वनपरिक्षेत्र विभागाच्यावतीने बुद्ध पौर्णिमेनिमित्त उदापूर येथे पिंपळाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

===Photopath===

270521\27pun_5_27052021_6.jpg

===Caption===

२७ खोडद  ओतूर वनपरिक्षेत्र विभागाच्या वतीने बुद्ध पौर्णिमेच्या निमित्त उदापूर येथे पिंपळाच्या वृक्षांची लागवड करण्यात आली.

Web Title: Conservation of Pimple tree is important for good health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.