आदिवासी सांस्कृतिक महोत्सव सुरू

By Admin | Published: March 26, 2017 02:17 AM2017-03-26T02:17:51+5:302017-03-26T02:17:51+5:30

आदिवासी भागातील हस्तकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आदिवासी संशोधन व

In a considerable bedchrulchau त्याच्या loving consider keeping acয়chauas ਰੂਪ keeping In Common Being Common times we কে loving-keeping ed In-loving | आदिवासी सांस्कृतिक महोत्सव सुरू

आदिवासी सांस्कृतिक महोत्सव सुरू

googlenewsNext

पुणे : आदिवासी भागातील हस्तकलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने पुण्यात २४ ते २८ मार्चदरम्यान ५ दिवसांचा आदिवासी सांस्कृतिक महोत्सव आयोजित केला आहे. क्वीन्स गार्डन येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आवारात होणाऱ्या आदिवासी हस्तकला प्रदर्शन, आदिवासी पारंपरिक नृत्यस्पर्धा, लघुपट महोत्सव या स्वरूपात होणार आहे.
हस्तकला प्रदर्शनामध्ये वारली, गोंडी पेटिंग, आदिवासी दागदागिने, लाकडी कोरीव काम, वेताच्या वस्तू, डोकरा आर्ट, आयर्न आर्ट, वनौषधी, लगद्याचे मुखवटे, गवताच्या शोभेच्या वस्तू पुणेकरांसाठी उपलब्ध होणार आहेत.
पारंपरिक नृत्यस्पर्धेत विविध आदिवासी जमातींच्या १७ नृत्यपथकांतील कलाकारांनी धामडी नृत्य, ढोल नाच, सांबळ नृत्य, लेझीम, होळी नृत्य, मांढरी नृत्य हे प्रकार सादर केले. (प्रतिनिधी)

Web Title: In a considerable bedchrulchau त्याच्या loving consider keeping acয়chauas ਰੂਪ keeping In Common Being Common times we কে loving-keeping ed In-loving

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.