महापालिकेचे आर्थिक आरोग्य लक्षात घेता आयुक्तांचा निर्णय योग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:16 AM2021-09-09T04:16:07+5:302021-09-09T04:16:07+5:30
पुणे : महापालिकेत २०१७ पासूनच्या म्हणजेच भाजप सत्तेत आल्यापासूनच्या अर्थसंकल्पांचा मागोवा घेतल्यास, प्रत्येक अर्थसंकल्पात ४० ते ४५ टक्क्यांची तूट ...
पुणे : महापालिकेत २०१७ पासूनच्या म्हणजेच भाजप सत्तेत आल्यापासूनच्या अर्थसंकल्पांचा मागोवा घेतल्यास, प्रत्येक अर्थसंकल्पात ४० ते ४५ टक्क्यांची तूट दिसून येत आहे़ त्यामुळे आजमितीला महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी, महापालिकेचे आर्थिक आरोग्य लक्षात घेऊन घेतलेला निर्णय योग्य असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे.
बुधवारी अर्थसंकल्पाच्या अंमलबजावणीच्या विषयावरून भाजपने आयुक्तांच्या भूमिकेकडे व म्हणण्याकडे दुर्लक्ष करून सभा तहकूब केली. ही सत्ताधा-यांची कृती निषेधार्ह असून, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आयुक्त विक्रम कुमार यांच्या निर्णयाच्या पाठिशी आहे़ येत्या काही महिन्यांत होणारी महापालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून, शहराचे हित जोपासले गेले नाही तरी चालेल़ पण स्वत:चे आर्थिक हित जोपासले गेले पाहिजे, या एकमेव उद्देशातून महापालिका आयुक्त व प्रशासनावर भाजपकडून वारंवार दबाव आणण्यात येत आहे़ परंतु अशावेळी आयुक्त त्यांच्याकडे असलेली जबाबदारी पूर्णपणे उत्तरदायित्वाने निभावण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असून आम्ही त्यांच्या या भूमिकेचे स्वागत करतो असेही त्यांनी सांगितले आहे.