उपाययोजनांमध्ये सातत्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:09 AM2021-07-26T04:09:03+5:302021-07-26T04:09:03+5:30

बारामतीतील कोरोना परिस्थितीचा घेतला आढावा बारामतीत घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा बारामती : बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात ...

Consistency in measures | उपाययोजनांमध्ये सातत्य

उपाययोजनांमध्ये सातत्य

Next

बारामतीतील कोरोना

परिस्थितीचा घेतला आढावा

बारामतीत घेतला कोरोना परिस्थितीचा आढावा

बारामती : बारामती शहरासह तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात येत आहे. मात्र कोरानाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांमध्ये सातत्य राखा, तसेच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने सतर्क राहून योग्य नियोजन करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.

बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या सभागृहात रविवारी (दि. २५) कोविड-१९ विषाणू प्रादुर्भावाची परिस्थिती आणि उपाययोजनांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला. त्या वेळी ते बोलत होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव आटोक्यात येत आहे परंतु प्रशासनाने उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे गरजेचे आहे. कोणत्याही परिस्थितीत कोरोना संसर्गाचा पॉझिटिव्हीटी रेट वाढता कामा नये. कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेबाबत शहरात तसेच ग्रामीण भागात सोयीसुविधा उपलब्ध करुन ठेवणे आवश्यक आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे. तिसऱ्या लाटेत लहान मुलांना असलेला धोका लक्षात घेता सर्व सोयीसुविधा उपलब्ध कराव्यात, सर्व रुग्णालयात आॅक्सिजन बेड्सची व्यवस्था सुनिश्चित करणे, कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी घेणे गरजेचे आहे. नागरिकांनी मास्क वापरावा, सार्वजनिक ठिकाणी गर्दी होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे आवाहनही त्यांनी या वेळी केले.

------------------------

रायगड व रत्नागिरी जिल्ह्यातील पूरग्रस्तांना अतुल बालगुडे व देसाई इस्टेट मधील नागरिकांच्या तर्फे ३०० फूड पॅकेट मदत म्हणून पूरग्रस्तांना पाठविण्यात आले. या मदतीचे वाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त भागाकडे रवाना करण्यात आले. या वेळी बारामती पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी संजय जाधव यांच्या ‘आठवणीची वही’ या काव्यसंग्रहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

बारामती येथून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक मदत पाठवण्यात आली.

२५०४२०२१-बारामती-०४

Web Title: Consistency in measures

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.