बारामतीकरांना दिलासा! कोरोना रुग्ण सापडला तरी शहरातील दुकाने 'रोटेशन' पध्दतीने सुरुच राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 06:48 PM2020-05-12T18:48:06+5:302020-05-12T18:48:56+5:30
केवळमंगळवारी ( दि. १२) कोरोनाचा दहावा रुग्ण सापडलेला माळेगांव बु परिसर सील
बारामती: नुकतीच बारामतीत पुणे शहराच्या धर्तीवर ' रोटेशन ' पद्धत दुकाने उघडण्यास सुरवात झाली. मात्र,मंगळवारी(दि १२) तालुक्याच्या ग्रामीण भाागात दुसरा तर, बारामतीत दहावा कोरोनाचा रुग्ण सापडला आहे. त्याचा फटका नुकत्याच सुरु झालेल्या शहरातील व्यावसायिकांना बसण्याची चर्चा शहरात सुुरु झाली. मंगळवारी ( दि. १२)सापडलेला रुग्ण माळेगांव बु. मध्ये सापडला आहे,त्यामुळे शहर प्रतिंबधित क्षेत्रात समावेश करण्याचा प्रश्नच नाही. परिणामी शहरातील सुरु झालेली दुकाने सुरुच राहणार असल्याचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले.
बारामती एमआयडीसीत देखील उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तेथील उत्पादन सुरु झाले आहे. तसेच, बारामती शहरात सोमवार (दि ११) पासून पुणे शहराच्या धर्तीवर दुकाने सुरू करण्यात आली. आहेत . सर्व दुकानांनादिवस ठरवून देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे .व्यापारीवर्गाने देखील या प्रयोगाला मान्यता दिली आहे .त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मागणीसह पूर्वपदावर येण्यास सुरवात झालेल्या जनजीवनावर आज सापडलेल्या दहाव्या रुग्णाचा परिणाम होणार का,याबाबत बारामतीकर साशंक होते.
मात्र, प्रांताधिकारी कांबळे यांनी बारामतीत रोटेशन पध्दतीने सुुरु केलेली दुकाने खुलीच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. ग्रामीण आणि शहरवेगळा भाग आहे.आज सापडलेला रुग्ण माळेगाव येथील असल्याने केवळ तोेच परीसरप्रतिबंधित क्षेत्र म्हणुन घोषित केला आहे. शहराची रेड झोन मधुन ऑरेंजझोनच्या दिशेने वाटचाल सुरुच राहणार आहे. ग्रामीण भागाची ऑरेंज झोनच्यादिशेने वाटचान खडतर असल्याचे देखील प्रांताधिकारी कांबळे यांनी स्पष्टकेले आहे.
दरम्यान,शहरात आज दुसºया दिवशी कापड दुकाने, ज्वेलरी, सोने दुकाने, भांडी, टेलरींग, फुटवेअर दुकाने, रस्सी, पत्रावळी, वॉच, सुटकेश, बॅग आदीदुकाने सुरू होती. यामध्ये कापडाच्या दुकानासह सोन्याच्या दुकानातनागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
—————————————————