दिलासादायक!पुणे शहरात सोमवारी नवीन पॉझिटिव्हपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2020 08:46 PM2020-08-31T20:46:37+5:302020-08-31T20:47:09+5:30
शहरातील प्रत्यक्षात रुग्णसंख्या १४ हजार ९९९ झाली आहे.
पुणे : शहरातील कोरोना झालेल्या रुग्णांची संख्या ९५ हजार ३७३ झाली असून सोमवारी दिवसभरात ८७६ रूग्णांची वाढ झाली. तर, दिवसभरात १३८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. विविध रुग्णालयातील ८८४ रुग्ण अत्यवस्थ असून दिवसभरात एकूण ३७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, प्रत्यक्षात सक्रिय रुग्णसंख्या १४ हजार ९९९ झाली आहे.
उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी ८८४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यातील ५२७ रुग्ण व्हेंटिलेटरवर असून ३५७ रुग्ण आयसीयूत उपचार घेत आहेत. तर, ३ हजार १०६ रुग्ण ऑक्सिजनवर आहेत.
दिवसभरात ३७ मृतांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये पुण्याबाहेरील १९ रूग्णांचा समावेश आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या २ हजार ३०४ झाली आहे. दिवसभरात एकूण १ हजार ३८४ रुग्ण आजारातून बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहेत. आजारातून बरे झालेल्यांची एकूण संख्या ७८ हजार ७० झाली आहे. तर एक्टिव्ह रूग्णांची संख्या १४ हजार ९९९ झाली आहे.
-------------
दिवसभरात विविध केंद्रांवर एकूण २ हजार ८४७ नागरिकांची स्वाब तपासणी करण्यात आली असून आतापर्यंत ४ लाख ५१ हजार ५३ रूग्णांची तपासणी करण्यात आली आहे.