विवेकवादी विचार संपविण्याचे कारस्थान

By admin | Published: August 31, 2015 04:12 AM2015-08-31T04:12:59+5:302015-08-31T04:12:59+5:30

डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यापाठोपाठ कर्नाटकमधील ज्येष्ठ विचारवंत व माजी कुलगुरू डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचा रविवारी सकाळी दोघा

Conspiracy of disseminating discriminating ideas | विवेकवादी विचार संपविण्याचे कारस्थान

विवेकवादी विचार संपविण्याचे कारस्थान

Next

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्यापाठोपाठ कर्नाटकमधील ज्येष्ठ विचारवंत व माजी कुलगुरू डॉ. एम. एम. कलबुर्गी यांचा रविवारी सकाळी दोघा अज्ञात हल्लेखोरांनी गोळ््या झाडून खून केला. विवेकवादी विचार संपविण्याविण्याचे हे मोठे कारस्थान असल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून पुरोगामी कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त करण्यात आला.
डॉ. कलबुर्गी यांच्या घरात घुसून हल्लेखोरांनी गोळ््या झाडल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून हिंदू धर्मातील अंधश्रद्धेवर केलेल्या टिकेमुळे त्यांना धमक्या देण्यात आल्या होत्या. याचा धिक्कार करताना ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य म्हणाले, ‘‘पुरोगामीविरोधी सनातनी हा झगडा काही शतकांचा आहे. आता तो विकोपाचा होत आहे. पुरोगामी विचारसरणी वैज्ञानिक व इतर गोष्टींनी आघाडीवर जात आहे. त्यामुळे सनातनी मंडळी पिसाळली आहेत. मात्र, विचार मरत नाही तर ते अधिक परिपक्व होतात. सॉके्रटिस, तुकाराम आणि महात्मा गांधी यांचे विचार अधिक खोलवर रुजले. हे त्याचे उत्तम उदाहरण आहे.’’
विवेकवादी विचारांच्या कार्यकर्त्यांच्या खुनाचा पॅटर्न तयार होत चालला आहे, यामागे मोठी साखळी आहे. हिसेंला मान्यता असलेल्या विचारांच्या व्यक्तींनीच ही हत्या
केली आहे. त्याविरुद्ध खंबीरपणे
उभे राहावे लागणार असल्याचे
रिक्षा पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार यांनी सांगितले.

Web Title: Conspiracy of disseminating discriminating ideas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.