पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट; एनआयए चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 12:09 PM2023-11-07T12:09:06+5:302023-11-07T12:15:41+5:30

पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला असून दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिरियामधून आदेश मिळत होते

Conspiracy to carry out serial bomb blasts in Pune Shocking information comes out from NIA investigation | पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट; एनआयए चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

पुण्यात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट; एनआयए चौकशीतून धक्कादायक माहिती समोर

पुणे : देशभरात दहशतवाद आणि हिंसाचार पसरविण्याच्या पुणे इसिस मॉडयुल प्रकरण उघडकीस येत असताना पुणे पोलिसांच्या ताब्यातून पळून गेलेला मोहम्मद शाहनवाज आलम दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ने अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो फरार होता. त्याच्याविरुद्ध दिल्लीत दहशतवादी कृत्य केल्याचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. 

दिल्ली पोलिसांचा विशेष सेल शोध घेत होता. पुणे पोलिसांशी ते सातत्याने संपर्कात होते. गेल्या महिन्यात दिल्ली पोलिसांच्या विशेष सेलने त्याला पकडले होते. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून एनआयएने पुणे इसिस मॉड्युल प्रकरणात अटक केली. मोहम्मद शाहनवाज आलम याने हत्यारे, विस्फोटक, खरेदी केले होते. दिल्लीत एक खोलीही भाड्याने घेतली होती.

त्यानंतर पुणे शहरात इसिस मॉड्यूल प्रकरणात एनआयएने आरोपपत्र दाखल केले आहे. या आरोपपत्रातून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) धक्कादायक दावे केले आहेत. दहशतवाद्यांची एनआयएने केलेल्या चौकशीची माहिती आरोपपत्रानंतर समोर आली आहे. पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवून आणण्याचा कट अतिरेक्यांनी आखला होता. त्यासाठी त्या दहशतवाद्यांना थेट सिरियामधून सूचना मिळत होत्या, अशा खळबळजनक दावा एनआयएने केला आहे. 

पुणे शहरातील कोथरुड पोलिस गस्त घालत असताना १९ जुलै २०२३ रोजी दुचाकी चोरीचा प्रयत्न करीत असताना मोहम्मद शाहनवाज आलम, इम्रान खान आणि युनूस साकी या तिघांना पकडण्यात आले होते. त्यांच्या कोंढव्यातील घरी नेत असताना मोहम्मद आलम हा पळून गेला होता. त्यानंतर या तिघांच्या घरझडतीत मिळालेल्या साहित्यावरुन ते दहशतवादी कृत्यात सहभागी असल्याचा संशय निर्माण झाला. त्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने केलेल्या तपासणीत त्यांना एनआयए ने त्यांना जयपूर बॉम्बस्फोट प्रकरणात फरारी घोषित केले असून त्यांच्यावर १० लाख रुपयांचे बक्षीस लावले असल्याचे समोर आले. तेव्हापासून मोहम्मद आलम याचा शोध घेण्यात येत होता. अखेर Mआलमचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याच्या चौकशीतून पुणे शहरात साखळी बॉम्बस्फोट घडवण्याचा कट समोर आला. दहशतवाद्यांना साखळी बॉम्बस्फोट घडवण्यासाठी सिरियामधून आदेश मिळत होते. साखळी बॉम्बस्फोट किंवा मोठा घातपात घडवून दहशत निर्माण करण्याचा कट त्यांनी आखला होता. हे एएनआयने केलेल्या चौकशीतून समोर आले आहे.   

Web Title: Conspiracy to carry out serial bomb blasts in Pune Shocking information comes out from NIA investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.