"सनातन धर्माला समाजकंटकांकडून बदनाम करण्याचे षडयंत्र" गोव्याचे राज्यपाल पिल्लेंचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2023 08:41 PM2023-10-03T20:41:42+5:302023-10-03T20:42:50+5:30

निगडी येथील नायर सर्व्हिस सोसायटीच्या (एनएसएस)वतीने ओणमनिमित्ताने आयोजित सांस्कृतिक व विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते....

"Conspiracy to defame Sanatan Dharma by sociopaths" Goa Governor P.S. Sreedharan Pillai's statement | "सनातन धर्माला समाजकंटकांकडून बदनाम करण्याचे षडयंत्र" गोव्याचे राज्यपाल पिल्लेंचे वक्तव्य

"सनातन धर्माला समाजकंटकांकडून बदनाम करण्याचे षडयंत्र" गोव्याचे राज्यपाल पिल्लेंचे वक्तव्य

googlenewsNext

पिंपरी : सनातन धर्म हा प्राचीन आहे. इंडोनेशियासारख्या देशात भारतीय संस्कृतीचे जतन केले जात आहे. मात्र, आपल्या देशात काही समाजकंटक सनातन धर्माचे उच्चाटनासाठी नकारात्मक विचार पसरवीत आहे. या त्यांच्या दुष्कृत्याविरोधात सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे, असे मत गोव्याचे राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्ले यांनी काढले.

निगडी येथील नायर सर्व्हिस सोसायटीच्या (एनएसएस)वतीने ओणमनिमित्ताने आयोजित सांस्कृतिक व विद्यार्थी सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सीरमचे संचालक पी.सी. नंबीयार, गणेश कुमार, सोसायटीचे संस्थापक टीपीसी नायर, अध्यक्ष विश्वनाथन नायर, सचिव शशी कुमार, खजिनदार पी रवीन्द्रन नायर आदी उपस्थित होते.

राज्यपाल श्रीधरन पिल्लई म्हणाले, इंडोनेशियन व्यक्ती मूळ संस्कृती विसरलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर सनातन धर्माचे उच्चाटन करण्याच्या सर्व प्रयत्नांचा प्रतिकार केला पाहिजे. चटम्बी स्वामीगल, मन्नत पद्नाभन आचार्य आणि श्री नारायण गुरुदेवन या सर्वांनी केवळ सर्वांच्या ऐक्यासाठी कार्य केले.

गणेशकुमार म्हणाले, एनएसएस ही केवळ नायरची संस्था नसून ती सर्व समाजाला एकत्रित आणणारी संस्था आहे. विश्वनाथन नायर यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. यावेळी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच मल्याळी बांधवांनी मल्याळी हिंदी गाणी, पारंपरिक नृत्य सादर केले. रवींद्रन नायर यांनी आभार मानले.

Web Title: "Conspiracy to defame Sanatan Dharma by sociopaths" Goa Governor P.S. Sreedharan Pillai's statement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.