पुण्यात दहा हजारांची लाच घेताना हवालदार ACB च्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2022 06:34 PM2022-06-09T18:34:03+5:302022-06-09T18:35:02+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई...

constable lonikand police station ACB caught taking bribe 10 thousand in Pune | पुण्यात दहा हजारांची लाच घेताना हवालदार ACB च्या जाळ्यात

पुण्यात दहा हजारांची लाच घेताना हवालदार ACB च्या जाळ्यात

Next

पुणे : अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी एक लाख दहा हजार रुपये लाच मागून त्यापैकी दहा हजार रुपये लाच घेणारे लोणीकंद पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार शिरीष आप्पासाहेब कामठे याला पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून शनिवारी (ता. ४) रंगेहाथ पकडले आहे.

पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कामठे (वय ३६, रा. पुणे) याच्याविरुद्ध लोणीकंद पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ५२ वर्षांच्या तक्रारदाराने पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारदार यांनी खरेदी केलेल्या जागेमध्ये दुसऱ्या व्यक्तीने अतिक्रमण केले आहे. तक्रारदार यांच्या जागेत सुरू असलेले अनधिकृत बांधकाम थांबवण्यासाठी लोणीकंद पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल शिरीष कामठे याने एक लाख दहा हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली.

प्राप्त तक्रारीची पडताळणी केली असता कामठे याने लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. कामठे याने एक लाख दहा हजार रुपये मागणी करून त्यातील १० हजार रुपये स्वीकारताना पुणे एसीबीच्या पथकाने त्यास रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक श्रीराम शिंदे व त्यांच्या पथकाने केली.

Web Title: constable lonikand police station ACB caught taking bribe 10 thousand in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.