Constitution Day: संविधान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांमधून संविधानाचा जागर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 01:27 PM2018-11-26T13:27:57+5:302018-11-26T14:04:06+5:30
26 नाेव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. या दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले हाेते.
पुणे : 26 नाेव्हेंबर हा दिवस देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. या दिनानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात अाले हाेते. कुठे कवितांमधून संविधानाचा जागर करण्यात अाला तर कुठे संविधानाच्या उद्दीशिकेचे सामुहिक पठण करण्यात अाले. सर्व शाळांमध्ये देखील संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात अाला.
संविधान दिनानिमित्त कवितेतून संविधानाचा जागर करण्याचा ‘लोकशाही काव्यमैफल’ हा अनोखा उपक्रम साहित्य सांस्कृतिक कट्ट्यातर्फे राबविण्यात आला. सिंहगड रस्त्यालगत कल्पना चावला शाळेजवळील नाना-नानी पार्कमध्ये झालेल्या या उपक्रमाला स्थानिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.संविधानाच्या उद्देशिकेचे वाचनाने सुरवात झाल्यानंतर नारायण खरे यांनी स्वातंत्र्याचा खरा अर्थ न समजल्याची खंत कवितेतून व्यक्त केली तर सचिन दुस्सल यांनी ‘संविधानाकडे मी कसे पाहू’ ही रचना सादर केली. सुप्रिया सांगळे यांनी संविधान ही सर्वांची जबाबदारी असल्याचे कवितेतून सांगितले. कु. काजल पवार यांनी महापुरुषांच्या जातीतील वाटणीवर बोट ठेवणारी रचना सादर केली. डॉ. जितेंद्र शिंदे यांनी संविधानाची प्रत जाळल्याचा निषेध करणारी रचना मांडली. स्त्री भ्रूण हत्येवर भाष्य करणारी कविता शाहीर महादेव खंडागळे यांनी सादर केली तर डॉ. सारिका शिंदे यांनी स्त्रीची व्यथा कवितेद्वारे मांडली. डॉ. भालचंद्र सुपेकर यांच्या मार्मिक गजलेने या मैफलीची सांगता झाली.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या ३० शैक्षणिक आस्थापनातर्फे भारतीय घटनेच्या उद्देशिकेचे (प्रीएम्बल ) भव्य सामूहिक वाचन उपक्रम आयोजित करण्यात आला होता. संस्थेचे अध्यक्ष डॉ . पी . ए . इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते .यावेळी इंग्रजी ,मराठी ,हिंदी भाषेत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले . संस्थेचे १० हजार विद्यार्थी ,प्राचार्य ,प्राध्यापक ,शिक्षकवर्ग या उपक्रमात सहभागी झाले. आझम कॅम्पस ( पुणे कॅम्प )येथील मैदानात हा कार्यक्रम सोमवारी 26 नोव्हेंबर रोजी सकाळी पावणे अकरा वाजता झाला.संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार ,सचिव लतीफ मगदूम ,नियामक मंडळाचे सदस्य , विभागप्रमुख ,प्राध्यापक -शिक्षक वर्ग उपस्थित होता.
विद्यानगर येथील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने अायाेजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात 7 हजार विद्यार्थी व पालकांनी संविधानाच्या प्रस्तावनेचे सामुहिक पठण केले. त्याचबराेबर या उद्देशिकेच्या हजाराे प्रती सुद्धा वाटण्यात अाल्या. या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डाॅ. नितीन करमळकर उपस्थित हाेते.