Constitution Day : भारतीय संविधानाबाबत तुम्हाला हे माहितीये का ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 02:46 PM2018-11-26T14:46:13+5:302018-11-26T14:46:56+5:30

26 नाेव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशभरात संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. या दिवसाचे महत्त्व भारताच्या इतिहासात माेठे अाहे.

Constitution Day: Do you know about Indian constitution? | Constitution Day : भारतीय संविधानाबाबत तुम्हाला हे माहितीये का ?

Constitution Day : भारतीय संविधानाबाबत तुम्हाला हे माहितीये का ?

Next

पुणे : भारतीय लाेकशाहीला जगातील सर्वात माेठी लाेकाशाही म्हणून अाेळखले जाते. भारताने संघराज्य पद्दतीचा अवलंब केला अाहे. 15 अाॅगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर हा देश एका नवीन संविधानावर, एका नव्या व्यवस्थेवर चालावा यासाठी संविधानाची निर्मिती करण्याचा निर्णय घेण्यात अाला. दरवर्षी 26 नाेव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जात असताना भारतीय संविधानाचे निर्माते डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांचे स्मरण केले जाते. अांबेडकरांनी भारतीय संविधानाच्या रुपाने जगातील सर्वात माेठे संविधान तयार केले अाहे. जगातील सर्व संविधानांचा बारीक अभ्यास केल्यानंतर भारताचे संविधान तयार करण्यात अाले अाहे. या संविधानाला जगातील सर्वात माेठे संविधान म्हणून अाेळखले जाते. अापल्या संविधानात 448 अनुच्छेत, 12 उपसूचना अाणि 94 संशाेधनांचा समावेश अाहे. हे हस्तलिखित संविधान असून यात 48 अाॅर्टिकल अाहेत. संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने अाणि 17 दिवसांचा कालावधी लागला. 

26 नाेव्हेंबर 1950 ला भारत एक लाेकशाही राष्ट्र म्हणून अाेळखले जाऊ लागले. 
डाॅ. बाबासाहेब अांबेडकर हे संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष हाेते. त्यांनी भारतातील विविधेचा विचार करुन सर्वसमावेशक असे संविधान तयार केले. 26 नाेव्हेंबर 1949 ला भारतीय संविधान सभेकडून स्वीकारण्यात अाले. यानंतर 26 जानेवारी 1950 ला भारत या संविधानाप्रमाणे चालू लागला. 26 नाेव्हेंबरला संविधान हे संविधान सभेने स्वीकारल्यामुळे हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जाताे. भारत स्वतंत्र झाल्यानंतर 29 अाॅगस्ट 1947 ला संविधानाच्या मसुदा समितीची स्थापना करण्यात अाली हाेती. या समितीचे अध्यक्ष अांबेडकर हाेते. 

यात कुठल्याही प्रकारचे टायपिंग किंवा प्रिंटचा वापर करण्यात अाला नाही. 
संविधानाचा मसुदा तयार करणारी समिती हिंदी अाणि इंग्रजी या दाेन्ही भाषांमध्ये लिहिण्यात पारंगत हाेती. संविधानाच्या मसुद्यात कुठल्याही प्रकारच्या टायपिंगचा किंवा प्रिंटचा वापर करण्यात अाला नाही. संपूर्ण संविधान हे हाताने लिहीण्यात अाले. संविधान सभेच्या 284 सदस्यांनी 24 जानेवारी 1950 ला संविधानाच्या मसुद्यावर सही केली हाेती. त्यानंतर दाेन दिवसांनी म्हणजेच 26 जानेवारी 1950 ला भारतात संविधान लागू करण्यात अाले. 

वी द पीपल ने संविधानाची सुरुवात 
वी द पीपल अाम्ही भारताचे लाेक या वाक्याने संविधानाच्या प्रस्ताविकेची सुरुवात हाेते. भारतीय लाेकशाही ही नागरिकांनी नागरिकांसाठी तयार केलेली लाेकशाही अाहे. भारतीय संविधानाने प्रत्येक भारतीयाला स्वातंत्र्य तसेच अधिकार प्रदान केले अाहेत. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही भारतीय संविधानाची मुल्ये अाहेत. 

लवचिक संविधान 
भारताचे संविधान निर्मात्यांकडे दूरदृष्टी हाेती. काळानुरुप संविधानामध्ये बदल करता येतील अशी व्यवस्था संविधान निर्मात्यांनी तयार केली. अात्तापर्यंत अनेकदा संविधानामध्ये काळानुरुप काही बदल करण्यात अाले अाहेत. परंतु स्वातंत्र्य, समता, बंधुता ही संविधाची प्रमुख मुल्ये बदलता येत नाहीत.  

संविधान दिनानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे अायाेजन 
संविधान दिनानिमित्त संपूर्ण भारतात विविध कार्यक्रमांचे अायाेजन करण्यात येते. सर्व सरकारी कार्यालये अाणि शाळांमध्ये संविधान दिन साजरा करण्यात अाला. युजीसी ने सुद्धा सर्व विद्यापीठांना संविधान दिन साजरा करण्याचे अादेश दिले हाेते. महाराष्ट्रातही विविध भागात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात अाला. संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन यावेळी करण्यात अाले.
 

Web Title: Constitution Day: Do you know about Indian constitution?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.