बांधकाम विभागाला दोनशे कोटींचा महसूल अपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:10 AM2020-12-26T04:10:32+5:302020-12-26T04:10:32+5:30

बांधकाम विभाग चौकट १ * पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमध्ये सध्या विकसनशील जमीनी मोठ्या प्रमाणात आहेत़ येथील ...

The construction department expects revenue of Rs 200 crore | बांधकाम विभागाला दोनशे कोटींचा महसूल अपेक्षित

बांधकाम विभागाला दोनशे कोटींचा महसूल अपेक्षित

Next

बांधकाम विभाग चौकट १

* पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमध्ये सध्या विकसनशील जमीनी मोठ्या प्रमाणात आहेत़ येथील होऊ घातलेली बांधकामे पाहता बांधकाम विभागाला या गावांमधून सुमारे १५० ते २०० कोटी रूपयांचा महसुल बांधकाम शुल्कापोटी अपेक्षित आहे़ त्याचवेळी या भागाला पाणीपुरवठा करण्यासाठी भामा आसखेड सारख्या आणखी कुठल्या पाणीपुरवठा योजनेची आवश्यकता पडेल का हे मात्र गावांच्या समावेशाबाबतच्या अंतिम आदेशानंतरच निश्चित करता येणार आहे व तेव्हाच या गावांची नगर नियोजन योजना राबविता येईल असे प्रशांत वाघमारे यांनी सांगितले़

--------------------------------------

* मिळकत कर चौकट २

पहिल्या टप्प्यात महापालिका हद्दीत जी ११ गावे समाविष्ट झाली, त्या गावांमधील ग्रामपंचायती नोंदणीनुसार १ लाख ४२ हजार मिळकती होत्या़ आता २३ गावांचा विचार करता हा आकडा दुप्पट धरला तर तीन ते साडेतीन लाख मिळकतींची भर पडणार आहे़ येथे टप्प्या-टप्प्याने कर आकारणी होणार असल्याने पाच वर्षांनतर या भागातून वर्षाकाठी सुमारे १०० कोटी रूपये मिळकत कर जमा होईल असा अंदाज आहे़ अशी माहिती विलास कानडे यांनी दिली़

या भागातील अनाधिकृत बांधकामांवर महापालिका हद्दीत आल्यावर ३ पट शास्ती लागणार हे निश्चित आहे़ परंतु, ११ गावांमध्येच अजून ही ३ पट शास्ती आकारली जात नाही़ येथील मिळकतींचे महापालिकेकडे वर्ग करण्याचे काम अद्यापही चालू आहे़ दरम्यान सेवा सुविधा नाही पण कर जास्त याबाबत जो काही निर्णय महापालिका घेईल ता या गावांनाही लागू राहिल़ परंतु, सध्या तरी मिळकत कराची आकारणी येथे सन १९९७ च्या धोरणानुसारच सुरू होईल असेही कानडे यांनी सांगितले़

------------------------------------

Web Title: The construction department expects revenue of Rs 200 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.