बांधकाम नकाशा चलन आता आॅनलाइन

By admin | Published: September 26, 2015 01:43 AM2015-09-26T01:43:37+5:302015-09-26T01:43:37+5:30

पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बांधकाम मंजुरीचे चलन आॅनलाइन करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. त्यामुळे लायझनिंग व एजंटगिरीला चाप बसला असून,

Construction map currency online now | बांधकाम नकाशा चलन आता आॅनलाइन

बांधकाम नकाशा चलन आता आॅनलाइन

Next

हणमंत पाटील, पिंपरी
पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) बांधकाम मंजुरीचे चलन आॅनलाइन करण्याचा प्रयोग सुरू केला आहे. त्यामुळे लायझनिंग व एजंटगिरीला चाप बसला असून, बांधकाम नकाशे मंजुरीच्या प्रक्रियेला गती आली आहे.
पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका, नगरपालिका व परिसरातील गावांचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी ‘पीएमआरडीए’ ची स्थापना करण्यात आली आहे. शिवाय, प्रधिकरणाच्या नवीन हद्दवाढीला महसूल विभागाने नुकताच हिरवा कंदील दाखविला आहे. त्यामुळे परिसरातील बांधकामे नकाशा मंजुरीच्या प्रस्तावांचे प्रमाण आणखी वाढणार आहे. त्या पार्श्वभूमीवर प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे यांनी आॅनलाइन चलन प्रक्रियेचा उपक्रम सुरू केला आहे.
सध्या ‘पीएमआरडीए’कडे प्रस्ताव दाखल होण्याचे प्रमाण रोज ७ ते ८ आहे. एका बांधकाम प्रकल्पाची तपासणी व चलन काढण्याच्या प्रक्रियेला साधारण दोन आठवड्यांचा कालावधी लागतो. शिवाय, मनुष्यबळाचा वापर होत असल्याने प्रस्तावात अनेक त्रुटी राहतात. त्यामुळे ही कामे लायझनिंग व एजंटांमार्फत करण्याचा प्रघात आहे.

Web Title: Construction map currency online now

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.