आदिवासी जागेवर एमटीडीसीचे बांधकाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 03:01 AM2018-08-21T03:01:50+5:302018-08-21T03:02:23+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे भीमाशंकर परिसरात उभारण्यात आलेले भक्तनिवास आदिवासी जागेवर बांधण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे

Construction of MTDC in tribal area | आदिवासी जागेवर एमटीडीसीचे बांधकाम

आदिवासी जागेवर एमटीडीसीचे बांधकाम

googlenewsNext

पुणे : सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे भीमाशंकर परिसरात उभारण्यात आलेले भक्तनिवास आदिवासी जागेवर बांधण्यात आले असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे बांधकाम पूर्ण झालेले असताना, प्रशासनाकडून हे निवास अद्याप सुरू करण्यात आलेले नाही. मात्र, संबंधित जागा शासनाच्या नावे बक्षीसपत्र करून घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, पुढील काही दिवसांत हे भक्तनिवास महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे (एमटीडीसी) सुरू केले जाणार आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे देशभरातून लाखो भक्त दर्शन घेण्यासाठी येतात. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून भाविकांच्या सोयीसाठी भीमाशंकरजवळील राजपूर येथे पाच एकर जागेत प्रशस्त भक्त निवास उभारण्यात आले. त्यासाठी सुमारे सात कोटी रुपयांचा खर्च आला. पीडब्लूडीकडून भक्तनिवासाचे बांधकाम २०१० मध्ये पूर्ण झाले. तसेच, एक कोटी ८० लाख रुपये निधी खर्च करून, २०१६ मध्ये फर्निचरचे काम पूर्ण करण्यात आले. हे भक्तनिवास एमटीडीसीतर्फे चालविले जाणार आहे.
या भक्तनिवासाच्या इमारतीमध्ये पहिल्या मजल्यावर ३८, तर दुसऱ्या मजल्यावर ५४ आणि तळमजल्यावर ७ अशा ९५ खोल्या आहेत. त्याचप्रमाणे स्वयंपाकगृह, उपहारगृह,८ लोकनिवास, २ बैठककक्ष अशा एकूण १०८ खोल्यांचे हे भक्तनिवास आहे. दरम्यान, सुमारे वर्षभरापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाने या भक्त निवासाची हस्तांतरप्रक्रिया पूर्ण केली. तसेच, त्याचा ताबा एमटीडीसीकडे दिला आहे. मात्र, काही तांत्रिक कारणांमुळे हे भक्तनिवास सुरू झाले नाही.

शासनाच्या नावे बक्षीसपत्र करण्याची प्रक्रिया सुरू
श्रावण महिन्याच्या सोमवारी भीमाशंकर येथे भाविकांची मोठी गर्दी होते. त्यामुळे श्रावण महिन्यात हे भक्तनिवास सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, संबंधित इमारत आदिवासी जागेवर बांधण्यात आल्यामुळे हे भक्तनिवास सुरू करता येत नसल्याची बाब जिल्हा प्रशासनाच्या निदर्शनास आली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने संबंधित जागा शासनाच्या नावे बक्षीसपत्र करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पुढील काही दिवसांत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर एमटीडीसीतर्फे हे भक्तनिवास सुरू केले जाईल, असे जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Construction of MTDC in tribal area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे