बांधकाम कामगारांना मिळणार पाच रुपयांत जेवण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2019 12:40 PM2019-08-02T12:40:12+5:302019-08-02T12:40:36+5:30

कोणतीही इमारत उभी राहण्याच्या प्रक्रियेत कामगारची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते.

Construction workers will get a meal in the five rupees | बांधकाम कामगारांना मिळणार पाच रुपयांत जेवण

बांधकाम कामगारांना मिळणार पाच रुपयांत जेवण

Next
ठळक मुद्देअटल आहार योजना : क्रेडाईच्या सहकार्याने शहरात उपक्रम सुरु

पुणे : अटल आहार योजनेअंतर्गत बांधकाम प्रकल्पावरील कामगारांना अवघ्या पाच रुपयांमधे दुपारचे जेवण उपलब्ध होणार आहे. क्रेडाई पुणे मेट्रोच्या सहकार्याने या योजनेची गुरुवारी सुरुवात केली. 
बाणेर येथील कल्पतरु जेड या बांधकाम प्रकल्पावर आयोजित कार्यक्रमात चारशेहून अधिक बांधकाम कामगारांना भोजन देऊन या प्रकल्पाचे उद्घाटन झाले. कामगार विभागाच्या उपजिल्हा कार्यकारी अधिकारी शीतल निकम, कामगार अधिकारी एम. ए. मुजावर, क्रेडाई पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमाचे तथा कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष जे. पी. श्रॉफ, कामगार कल्याण समितीचे निमंत्रक पराग पाटील, कल्पतरू प्रकल्पाचे वरिष्ठ उपाध्यक्ष नीलकंठ सरदेसाई या वेळी उपस्थित होते.
कोणतीही इमारत उभी राहण्याच्या प्रक्रियेत कामगारची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे त्यांना वेळच्या वेळी व चांगले अन्न नाममात्र दरात उपलब्ध होणे गरजेचे होते. क्रेडाई पुणे-मेट्रोच्या माध्यमातून ही योजना राबवण्यासाठी शासनाला यापुढेही संपूर्ण सहकार्य करु असे आश्वासन कामगार कल्याण समितीचे अध्यक्ष श्रॉफ यांनी या वेळी दिले. 
 मुजावर म्हणाले, ग्रामीण भागात राहणाऱ्या मजुरांचे तिथे कच्चे घर असेल अथवा अर्धा गुंठा जमीन असेल त्यांना पक्के घर बांधून देण्यासाठी सरकारकडून दीड लाख रुपयांचे अर्थसहाय्य मिळेल. तसेच, घर बांधून झाल्यानंतर आणखी ५० हजार रुपये दिले जातील. नोंदणी झालेल्या कामगारांसाठी सरकारच्या विविध २८ विविध योजना असून, त्याचा फायदा कामगारांनी घ्यायला हवा. 
बांधकाम कामगारांच्या मुलांच्या शालेय तसेच उच्च शिक्षणासाठी सरकारच्या योजना असून, त्या साठी त्यांनी अर्ज करावा असे आवाहन निकम यांनी केले. 

Web Title: Construction workers will get a meal in the five rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे