बांधकाम कामगारांचे आंदोलन
By admin | Published: December 31, 2014 12:11 AM2014-12-31T00:11:34+5:302014-12-31T00:11:34+5:30
आरोग्य विमा, गृहपयोगी वस्तू खरेदी ,घरबांधणी व घरदुरूस्ती योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने केली जात नाही.
पुणे : आरोग्य विमा, गृहपयोगी वस्तू खरेदी ,घरबांधणी व घरदुरूस्ती योजना अशा विविध योजनांची अंमलबजावणी योग्य पध्दतीने केली जात नाही. तसेच बांधकाम कामगारांच्या प्रश्नांकडे शासनाकडून नेहमीच दूर्लक्ष केले जाते,त्यामुळे मंगळवारी बांधकाम कामगार संघटनेतर्फे अपर कामगार आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करून निदर्शने करण्यात आली.
.घरबांधणी व घरदुरूस्ती या योजनेचे अर्जही मंडळाचे आधिकारी स्विकारत नाहीत. जनता आरोग्य विमा अंतर्गत बांधकाम कामगारास व त्यांच्या कुटुंबास औषधोपचारासाठी आरोग्य विमा कार्ड दिले. परंतु, या योजनेच्या अंमलबजावणीत अनेक तृटी आहेत. अनेक रुग्णालयांना ही योजना ही योजना राबविण्याचे निर्देश न दिल्यामुळे कामगारांची फसवणूकच होत आहे.त्यामुळे बांधकाम कामगार संघटनेतर्फे हे आंदोलन करण्यात आले.
४मुंबई येथे बांधकाम कामगारांचे कल्याण करण्यासाठी कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आली.या मंडळाकडे सुमारे तीन हजार कोटी रुपये जमा झाले आहेत. या मंडळाने 23 योजना जाहीर करुन कामगारांना लाभ देण्यास सुरुवात केली आहे. परंतु, या मंडळाना स्वतंत्र आधिकारी व कर्मचारी वर्ग नसल्यामुळे कामगारांना या योजनांचा लाभच मिळत नाही. मे 2014 मध्ये बांधकाम कामगारांसाठी गृहपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी 3 हजार रूपये देण्याचे जाहीर केले. त्यानुसार कामगारांनी विहीत नमुन्यात 2 हजार 476 अर्ज भरुन दिले.परंतु,मंडळाकडून केवळ 300 कामगारांना या योजनेचा लाभ देण्यात आला