चार महिन्यांनंतर दाखल करता येणार ग्राहक मंचाचे दावे; कोरोनाचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 06:42 PM2020-05-06T18:42:58+5:302020-05-06T18:44:10+5:30

लॉकडाउन सुरू झाल्यापासून ग्राहक मंचाचे कामकाज देखील बंद

Consumer forum claims can be filed after four months; Corona effect | चार महिन्यांनंतर दाखल करता येणार ग्राहक मंचाचे दावे; कोरोनाचा फटका

चार महिन्यांनंतर दाखल करता येणार ग्राहक मंचाचे दावे; कोरोनाचा फटका

Next
ठळक मुद्देलॉकडाउन सलग तीनदा वाढल्याने प्रलंबित दाव्यांना थेट सप्टेंबर महिन्यांमधील तारखा

पुणे ; कोरोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला असून त्यामुळे ग्राहक, नागरिक, पक्षकार, कर्मचारी या सर्वांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. सतत वाढणारा कोरोना यामुळे न्यायालयीन कामकाजात बदल करण्यात आले आहेत. विशेषतः ग्राहक मंचात दाखल असलेल्या दाव्यांना तब्बल चार महिन्यानंतरच्या तारखा देण्यात आल्या आहेत.
लॉकडाउन सुरू झाल्यापासून ग्राहक मंचाचे कामकाज देखील बंद आहे. त्यामुळे दाव्यांना पुढील तारीखा देण्यात आल्या होत्या. मात्र लॉकडाउन सलग तीनदा वाढल्याने प्रलंबित दाव्यांना थेट सप्टेंबर महिन्यांमधील तारखा देण्यात आल्या आहेत. ग्राहक संरक्षण अधिनियम 1980 मधील कलम 24 (ब) च्या अधिकारानुसार याबाबत परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे दावा दाखल केल्यापासून 90 दिवसांच्या आत ग्राहकांना न्याय द्यावा, हा ग्राहक मंचाचा नियम पाळणे शक्य होणार नाही.
अशीच स्थिती राष्ट्रीय ग्राहक मंचाची असून तेथील प्रकरणांना दीड महिन्यानंतरच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तात्काळ प्रकरण असल्यास न्यायालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 11 वाजताच ते सादर करावे, असे परिपत्रक राष्ट्रीय ग्राहक मंचाचे संयुक्त रजिस्टर एस. हनुमंता राव यांनी काढले आहे.
दाव्याच्या निमित्ताने मंचात येणाऱ्या नागरिकांची संख्या मोठी आहे. संबंधित व्यक्ती कुठल्या भागातून आला हे शोधणे अवघड असते. त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी लांबच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तसेच दररोज सूनवणी होणाऱ्या दाव्यांची संख्यादेखील कमी करण्यात आली आहे. त्यामुळे आपोआप गर्दी कमी होईल व संसर्ग वाढणार नाही, अशी माहिती मंचाकडून देण्यात आली.

 ............................

तातडीच्या दाव्यावर मात्र सुनावणी होणार

जुन्या प्रकरणांना लवकर तारखा द्याव्या, अशी मागणी होत आहे. त्याचा देखील विचार केला जाणार आहे. गर्दी होऊन कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी रोजच्या सूनवणींची संख्या कमी करून लांबच्या तारखा देण्यात आल्या आहेत. तातडीच्या दाव्यावर मात्र सुनावणी होणार आहे. 
- उमेश जावळीकर, अध्यक्ष, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंच.

Web Title: Consumer forum claims can be filed after four months; Corona effect

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.