ग्राहकांना लुटणारा वर्ग संघटीत व ग्राहक असंघटीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:37 AM2020-12-17T04:37:24+5:302020-12-17T04:37:24+5:30
-- राजुरी : ग्राहकांना लुटणारा वर्ग संघटीत आहे तर ग्राहक हा असंघटीत आहे. सध्या सोशल मिडियाच्या काळात दिशाभूल ...
--
राजुरी : ग्राहकांना लुटणारा वर्ग संघटीत आहे तर ग्राहक हा असंघटीत आहे. सध्या सोशल मिडियाच्या काळात दिशाभूल करणाऱ्यांचे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे सर्व सामान्य ग्राहकांनी व ग्राहक पंचायतच्या कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळासाठी सखोलपणे आभ्यास करून ग्राहक चळवळ विकसित करणे गरजेचे आहे.
असे मत ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी यांनी राजुरी येथे व्यक्त केले.
अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका (जिल्हा पुणे मध्य महाराष्ट्र प्रांत)यांच्यावतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त १५ते ३१ डिसेंबर २०२०ग्राहक जागरण पंधरवाड्याची सुरुवात राजुरी येथून करण्यात आली. सुरवातीला स्वामी विवेकानंदांचे प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. या मेळाव्याला महावितरण कंपनीचे उप कार्यकारी अभियंता श्रीकांत लोथे, ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटन मंत्री बाळासाहेब औटी, पुशुसवर्धन खात्याचे मा.सहायक आयुक्त डॉ. बाळकृष्ण घंगाळे, जिल्हा सदस्य गोरक्ष लामखडे , जुन्नर तालुका अध्यक्ष जगन्नाथ खोकराळे, जिल्हा महिला संघटक वैशाली अडसरे, दूधगंगा फूड आणि अग्रोचे संचालक मोहन नाईकोडी, तालुका सहसंघटक कौसल्या फापाळे, ह.भ.प.विशाल महाराज हाडवळे, शैलेश कुलकर्णी,भास्कर आहेर, ॲड. शिल्पा अडसरे, शांताराम हिंगे पाटील, भाऊसाहेब वाळुंज, जयेश खांडगे, सीताराम चव्हाण, गेनभाऊशेठ हाडवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
--
१६राजुरी ग्राहकांना दिन
फोटो - ग्राहक दिनानिमीत्ताने आयोजित केलेल्या ग्राहक जागरण सप्ताहात राजुरी (ता.जुन्नर)या ठिकाणी बोलताना ग्राहक पंचायतीचे प्रांत संघटनमंत्री बाळासाहेब औटी