कृषी बिल सवलत योजनेचा वीजग्राहकांनी लाभ घ्यावा : अभियंता गणेश श्रीखंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2021 04:10 AM2021-02-24T04:10:19+5:302021-02-24T04:10:19+5:30
आव्हाळवाडी : आव्हाळवाडी, माळवाडी, बकोरी (ता. हवेली) येथे वाघोली येथील विद्युत महावितरण कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी कृषी बिल ...
आव्हाळवाडी : आव्हाळवाडी, माळवाडी, बकोरी (ता. हवेली) येथे वाघोली येथील विद्युत महावितरण कार्यालयाच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी कृषी बिल सवलत योजनेची माहिती कृषीपंपधारक व विद्युत ग्राहकांना देण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये सामील झालेल्या विद्युत ग्राहकांना वाघोली महावितरणचे सहायक अभियंता गणेश श्रीखंडे यांनी शासनाच्या कृषी बिल सवलत योजना २०२० ची सविस्तरपणे माहिती दिली. तसेच विद्युत ग्राहकांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन केले.
विद्युत महावितरणच्या वतीने येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषी बिल सवलत योजना २०२० ची कृषिपंपधारकांसह विद्युत ग्राहक यांना माहिती देण्यासाठी आव्हाळवाडी, माळवाडी, बकोरी येथे बुधवारी (दि. १७ ) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये उपस्थित विद्युत ग्राहकांना कृषी बिल सवलत योजनेबाबत वाघोली कार्यालयाचे सहायक अभियंता श्रीखंडे यांनी सविस्तर माहिती दिली. तसेच नवीन शेती वीज जोडणी व नवीन धोरण आदी बाबी ग्राहकांना समजावून सांगितल्या. त्याबरोबर शासनाच्या महत्त्वाकांक्षी कृषी योजचा फायदेशीर असून वीजबिलाची थकबाकी वेळेत भरून थकबाकी मुक्त व्हावे, असे सांगितले. या वेळी पेरणे महावितरणचे सहायक अभियंता अंकुश मोरे, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्युत ग्राहक, वायरमन पुरुषोत्तम बेलदार, मंगेश बडे, गणेश परदेशी, बबलू शेप उपस्थित होते.
- गावांमध्ये जाऊन वीजपंपधारकांना व वीज ग्राहकांना कृषी वीज बिल सवलत योजनेबद्दल माहिती देताना सहा. अभियंता गणेश श्रीखंडे, सहायक अभियंता अंकुश मोरे.