रुपाली चाकणकरांशी संपर्क साधला; पण त्यांनी मला उत्तर नाही दिलं, कुचिक प्रकरणातील तरुणीचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2022 04:27 PM2022-03-31T16:27:08+5:302022-03-31T16:27:23+5:30
शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणातील गायब झालेल्या तरुणीची पुण्यात पत्रकार परिषद
पुणे : शिवसेना नेते रघुनाथ कुचिक प्रकरणाला आता वेगळेच वळण येऊ लागले आहे. मध्यंतरी या प्रकरणातील तरुणी गायब झाली होती. काही दिवसांनी तिचा शोधही लागला. आता खूप दिवसानंतर ही तरुणी समोर आली आहे. पुण्यात या तरुणीने पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळवण्यासाठी विविध मागण्या केल्या आहेत. यावेळी 'मी अनेकदा रूपाली चाकणकर यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला उत्तर दिलं नसल्याचा दावा या पीडित तरुणीने पत्रकार परिषदेत केला आहे.
''या सगळ्या प्रकरणात काही दिवसांपूर्वी रघुनाथ कुचिक यांच्या मुलीने , तरुणी आरोप करत आहेत त्यांची नार्को टेस्ट करा अशी मागणी केली होती. त्यानंतर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी लगेचच ती मागणी मान्य देखील केली. आता त्यावर विचार होत असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर मी अनेकदा रूपाली चाकणकर यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला पण त्यांनी मला उत्तर दिलं नाही. ज्याप्रमाणे रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची मागणी मान्य झाली तसच न्याय मलाही मिळावा अशी अपेक्षा पीडित तरुणीने बोलताना व्यक्त केली आहे.''
तरुणीचा कोर्टात जाण्याचा इशारा
रघुनाथ कुचीक प्रत्येक गोष्ट खोटं बोलत आहेत. आत्तापर्यंत मी गप्प होते कारण माझ्याकडे माझ्या डीएनए चाचणीचा रिपोर्ट नव्हता. पण आता तो आला आहे. आता रघुनाथ कुचिक यांनी सुद्धा आपली डीएनए टेस्ट करावी अशी मागणी तिने केली आहे. त्याचबरोबर माझ्याकडे जे काही पुरावे आहेत ते सगळे पुरावे घेऊन मी मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचं देखील तिने पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
माझा गर्भपात झालेलं बाळ त्यांचचं; तरुणीचा आरोप
रघुनाथ कुचिक यांनी एक चाचणी करत मी वडील होऊ शकत नाही. असं वैद्यकीय रित्या सिद्ध झाल्याचे सांगितलं होतं. मात्र रघुनाथ कुचिक यांनी केलेली ही टेस्ट खोटी असून माझा गर्भपात झालेलं बाळ त्यांचचं होता असा आरोप देखील तिने केला आहे.