सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ संपर्क साधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:09 AM2021-07-12T04:09:08+5:302021-07-12T04:09:08+5:30

पुणे : अपघातात एखादा जखमी झाला तर त्याला तातडीने मदत केल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. पहिल्या एक तासाला गोल्डन ...

Contact us immediately in case of cyber fraud | सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ संपर्क साधा

सायबर फसवणूक झाल्यास तत्काळ संपर्क साधा

Next

पुणे : अपघातात एखादा जखमी झाला तर त्याला तातडीने मदत केल्यास त्याचे प्राण वाचू शकतात. पहिल्या एक तासाला गोल्डन अवर म्हटले जाते. त्याचप्रमाणे ऑनलाईन शॉपिंग, पेमेन्ट करताना फसवणूक झाल्यास नागरिकांनी तत्काळ सायबर पोलिसांशी संपर्क साधावा. त्याठी दोन व्हॉट्सॲप मोबाईल नंबर जाहीर करण्यात आले आहेत. या क्रमांकावर फसवणूक झालेल्यांनी संपर्क साधल्यास तातडीने कारवाई करणे शक्य होणार आहे.

सायबर गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे ऑनलाईन व्यवहारात फसवणूक करून पैसे काढून घेतले जातात. नागरिकांना तत्काळ कोठे तक्रार करायची याची पूर्ण माहिती नसते. त्यामुळे नागरिकांना सायबर पोलिसांपर्यंत पोहोचण्यास विलंब झाल्याने सायबर चोरटे तातडीने पैसे त्यांच्या बँक खात्यातून/वॉलेटमधून काढून घेतो. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी त्यांचे टि्वटर अकाऊंटद्वारे जनजागृती मोहीम सुरू केली आहे. त्यांनी दोन व्हॉट्सॲप मोबाईल नंबर जाहीर केले आहेत.

पुणे शहरातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक झाल्यास त्यांनी तत्काळ या मोबाईल नंबरवर संपर्क साधून त्यांच्या सोबत फसवणुकीचा झालेला प्रकार सांगावा. त्यानंतर सायबर पोलीस त्या फसवणुकीचे व्यवहाराची कोणती माहिती पोलिसांना पुरवायची ते सांगतील. त्यानंतर ते व्यवहार थांबविण्यासाठी झालेल्या फसवणुकीच्या क्रमांक व लिंक स्क्रीनशॉट्स, डेबिटबाबत प्राप्त झालेले मेसेजेस, बँकेचे नाव, खाते क्रमांक, डेबिट कार्ड/ क्रेडिट कार्ड क्रमांक व लिंक मोबाईल नंबर इत्यादी माहिती सायबर पोलिसांच्या व्हॉट्सॲप क्रमांकावर पुरविल्यास सायबर पोलीस फसवणुकीत त्यांचे खात्यातून वळती झालेली रक्कम देशभरातील संबंधित बँक/ वॉलेटमध्ये गोठवून ठेवण्यासाठी कळवितात. त्यामुळे नागरिकांचे झालेल्या फसवणुकीतील व्यवहारातील पैसे परत मिळवता येतात.

नागरिकांनी कोणाचेही सांगण्यावरून मोबाईल क्लोन ॲप डाऊनलोड करू नये. कोणत्याही अनधिकृत लिंक ओपन किंवा शेअर करू नये. मोबाईलवर आलेला ओटीपी, क्रेडिट, डेबिट कार्डची माहिती शेअर करू नये. तसेच ऑनलाईन फसवणूक झाल्यास तत्काळ वरील क्रमांकावर संपर्क साधावा. संबंधित बँकेचे अधिकृत हेल्पलाईन खात्रीशीर माहिती असल्याशिवाय माहिती देऊ नये. गुगलसारख्या सर्च इंजिनवरील कस्टमर केअरचा क्रमांकावर माहिती देऊ नये. तो क्रमांक चोरट्याने रजिस्टर केलेला असून शकतो, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

व्हॉट्सॲप मोबाईल नं. ७०५८७१९३७१/७०५८७१९३७५

Web Title: Contact us immediately in case of cyber fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.