कंटेनरचा ब्रेकफेल, ‘विघ्न’ टळले! एसटीसह चार वाहनांचा चक्काचूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 01:51 AM2017-08-28T01:51:47+5:302017-08-28T01:51:57+5:30

कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने चार वाहनांना ठोस दिली. एसटीसह कंटनेर रस्त्यालगतच्या अर्धवट कामाच्या पुलाच्या खड्ड्यात पडला.

Container breakfell, 'hindrance'! Four vehicles collided with ST | कंटेनरचा ब्रेकफेल, ‘विघ्न’ टळले! एसटीसह चार वाहनांचा चक्काचूर

कंटेनरचा ब्रेकफेल, ‘विघ्न’ टळले! एसटीसह चार वाहनांचा चक्काचूर

Next

नसरापूर : कंटेनरचे ब्रेक निकामी झाल्याने त्याने चार वाहनांना ठोस दिली. एसटीसह कंटनेर रस्त्यालगतच्या अर्धवट कामाच्या पुलाच्या खड्ड्यात पडला. या विचित्र अपघातात २१ जखमी झाले आहेत. यापैकी १ गंभीर जखमी आहे. यात एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. कुठलीही जीवितहानी झाली नाही. कंटेनरचा चालक मात्र पळून गेला आहे. हा विचित्र अपघात रविवारी दुपारी पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडीलगत झाला.
कारमधील भारती सतीश शिवरकर (वय ६२, पुणे) व दुचाकीवरील किरण तानाजी बटाव (वय २५, रा. मनमाड) हे गंभीर जखमी आहेत. भोर तालुक्यातील ससेवाडी (शिंदेवाडी) येथील महामार्गावर असलेल्या तीव्र उतार व वळणावर असलेल्या अर्धवट पुलाच्या बांधकामात ब्रेक निकामी झालेल्या कंटेनरने (आर.जे.१९जी.सी ५३८१) पुढे चाललेल्या कारला धडक देत त्याच्या शेजारून पुण्यावरून भोरला जाणाºया एसटीला (एम.एच.१४,बीटी १६८९) रस्त्याच्या कडेला ढकलत शेजारून जाणाºया दुचाकीला धडक दिली. त्यावेळी एसटी बस व कंटेनर रस्त्यालगत अर्धवट बांधकामात जाऊन पडले. या वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कार, दुचाकी व एसटीतील २० प्रवासी जखमी झाले.जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गेले अनेक दिवस रखडत सुरू असलेली पुणे महामार्गावरची कामे या अपघातांना जबाबदार असल्याचा आरोप स्थानिकांनी यावेळी केला. दरम्यान, या अपघातातील जखमींना स्थानिक ग्रामस्थ व पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघाताच्या वेळी या अवजड वाहनांना काढण्यासाठी दोन क्रेनचा वापर केला गेला. स्थानिक पोलीस व वाहतूक पोलिसांनी बघ्यांची गर्दी आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

मोठी वाहतूककोंडी
या वेळी दुपारी झालेल्या अपघातामुळे पुणे-सातारा महामार्गावर सायंकाळपर्र्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. ससेवाडीपासून सुमारे १० ते १२ किमी अंतरावरील शिवरे या गावापर्यंत वाहतुकीची कोंडी झाली होती. इकडे जुन्या कात्रज बोगद्यातही काही काळ वाहतूककोंडी झाली होती.

अपघातातील जखमी
रवींद्र तानाजी बटाव (वय २२, रा. मनमाड, सध्या रा. नºहे, पुणे), सनी सतीश शिवरकर (वय ३२, रा. रास्ता पेठ, पुणे), सुजाता बनकर (वय ४०, शिवाजीनगर, पुणे), शोभा रमेश सोनवणे (वय ३८, गंजपेठ, पुणे), संदीप शांताराम वैराट (वय ३२, भवानी पेठ, पुणे), जियालाल किशोरीलाल यादव (वय ४२, रा. मार्केट यार्ड, पुणे), शोभादेवी जियालाल यादव (वय ४०, पुणे), उषा ईश्वर वाघ (वय २७, रा. कोथरूड, पुणे), सविता नामदेव दळवी (वय ४४, रा. शिवरे, ता. भोर), वसंत रेणूसे (वय ५०, रा. मेरावणे, ता. वेल्हा, पुणे), अतुल वसंत रेणुसे, निकिता वसंत रेणुसे, सुरेश भगवान साळुंखे (वय ५७, संघर्षनगर,मुंबई ७२), रमाबाई सुरेश साळुंखे (वय ५२) अनुश्री रामदास कदम व रामदास लक्ष्मण कदम.

Web Title: Container breakfell, 'hindrance'! Four vehicles collided with ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात