पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक; अपघातात 2 मुलींचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2022 11:31 IST2022-08-20T10:31:34+5:302022-08-20T11:31:57+5:30
पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात झालेल्या कंटेनर व दुचाकीत झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलींचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक; अपघातात 2 मुलींचा जागीच मृत्यू
कदमवाकवस्ती (पुणे) - पुणे-सोलापूर महामार्गावर मामाबरोबर दुचाकीवरून शाळेत जाताना कंटेनरच्या अपघातात दोन मुलींचा जाग्यावरच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना सकाळी ७ च्या दरम्यान लोणी स्टेशनच्या चौकात घडली. पुणे-सोलापूर महामार्गावरील कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतील लोणी स्टेशन चौकात झालेल्या कंटेनर व दुचाकीत झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलींचा जागेवरच मृत्यू झाला आहे. हा अपघात शनिवारी (ता. २०) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
छकुली कुमार शितोळे (वय १७) राजश्री कुमार शितोळे (वय- १० दोघीही रा. कवडीपाट, कदमवाकवस्ती, ता. हवेली) अशी अपघातात मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, छकुली ही इयत्ता अकरावीला लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल व ज्युनियर कॉलेज तर राजश्री ही इयत्ता सहावीत शिकत होती. शनिवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शाळेत जात असताना लोणी स्टेशन चौकात एका कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिली. यामध्ये दोघींचाही जागेवरच मृत्यू झाला.
पांडुरंग नवनाथ भिक्षे हे कवडी पाठ येथून त्यांच्या भाची नामे गायत्री नंदकुमार शितोळे वय 17 वर्षे व राजश्री नंदकुमार शितोळे वय दहा वर्ष यांना कन्या शाळा लोणी काळभोर मध्ये सोडण्याकरता जात असताना साडेसात वाजता लोणी स्टेशन चौक या ठिकाणी एका ट्रकने त्यांचे मोटरसायकलला मागून धडक दिली. मोटारसायकलवरील मामा आणि मुली वेगवेगळ्या ठिकाणी पडल्या नंतर ट्रक मुलींच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला असून मामाला कुठेही दुखापत झालेली नाही. ट्रक चालक ट्रकसह पळून गेला आहे. त्याचा तपास चालू आहे.