मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक; डोक्यावर हेल्मेट असल्याने वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2023 12:37 IST2023-03-17T12:37:01+5:302023-03-17T12:37:14+5:30
मागून भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने त्यांच्या दुचाकी गाडीला धडक...

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरची दुचाकीला धडक; डोक्यावर हेल्मेट असल्याने वाचले प्राण
लोणावळा (पुणे) : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरसोली गावाच्या हद्दीत बुधवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास कंटेनरने दुचाकीला धडक दिली. त्यामुळे झालेल्या अपघातामध्ये दुचाकीचालक व एक शाळकरी मुलगी गंभीर जखमी झाली.
वाकसई गावांमधील संतोष येवले हे मुलीला शाळेमध्ये सोडण्यासाठी दुचाकी गाडीवरून जात होते. मागून भरधाव वेगात आलेल्या एका कंटेनरने त्यांच्या दुचाकी गाडीला धडक दिली. संतोष यांच्या डोक्यात हेल्मेट असल्याने मोठी दुर्घटना टळली. या अपघातानंतरलोणावळा ग्रामीण पोलिसांनी सदर कंटेनर ताब्यात घेतला असून, जखमी संतोष व त्यांच्या मुलीवर तळेगाव येथील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. सदर अपघाताला जबाबदार असणाऱ्या कंटेनरचालकावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी या अपघातानंतर नागरिकांनी केली आहे.