हवेली तालुक्यातील जाहीर केलेले 'कंटेन्मेंट झोन' आठ तासांच्या आत हटवले ; दुकाने, ये- जा करण्यास परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2020 06:05 PM2020-06-06T18:05:03+5:302020-06-06T18:08:47+5:30

वाघोली व मांजरी बुद्रुक हद्दीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने, ही बंदी उठवण्यात येत असल्याचे केले जाहीर

Containment zones removed at eight places in Haveli taluka; permission to Come and go | हवेली तालुक्यातील जाहीर केलेले 'कंटेन्मेंट झोन' आठ तासांच्या आत हटवले ; दुकाने, ये- जा करण्यास परवानगी

हवेली तालुक्यातील जाहीर केलेले 'कंटेन्मेंट झोन' आठ तासांच्या आत हटवले ; दुकाने, ये- जा करण्यास परवानगी

googlenewsNext
ठळक मुद्देदुकाने, खासगी कार्यालय सकाळी नऊ ते सांयकाळी पाच या दरम्यान सुरु ठेवण्यास परवानगी

पुणे(लोणी काळभोर) : पुणे व पिंपरी चिचवड शहरातुन वरील चार गावात कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी आज (शनिवार) पहाटे पाच वाजल्यापासुन येत्या शुक्रवारी (दि. 12 ) रात्री बारा वाजेपर्यत, अत्यावश्यक सेवा वगळता शासकीय व खासगी क्षेत्रात काम करणारे कर्मचारी, अधिकारी यांना कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुकसह नऱ्हे या चार गावात शनिवारी ( दि. 6 ) पहाटेपासुन ये -जा करण्यास घालण्यात आलेली बंदी आठ तासांच्या आत हटवावी लागली आहे. वाघोली व मांजरी बुद्रुक हद्दीत कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने, ही बंदी उठवण्यात येत असल्याची घोषणा हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी केली आहे. 
       हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती, वाघोली, मांजरी बुद्रुकसह नऱ्हे या चार गावात यापुढील काळात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच प्रकारचे शासकीय, प्रशासकीय व खासगी अधिकारी व कर्मचारी यांना आज (शनिवार) पासुन सात दिवस, वरील चार गावात येजा करण्यास बंदी घातली होती. मात्र, वाघोली व मांजरी बुद्रुक या दोन्ही गावात सकाळपासुनच कायदा व सुवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. याबाबतची माहिती मिळताच, बारवकर यांनी वरील आदेश रद्द करत असल्याचे जाहीर केले आहे. 
 कदमवाकवस्ती, कुंजीरवाडी, वाघोली, मांजरी बुद्रुकसह हवेली तालुक्यातील आठ ठिकाणचा कंटेन्मेट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) शनिवार ( दि. 6 ) पासुन हटविण्यात आला आहे. यामुळे वरील आठ गावात दुकाने, खासगी कार्यालय व व्यापारी दुकाने सकाळी नऊ ते सांयकाळी पाच या दरम्यान सुरु ठेवण्यास परवानगी असल्याची माहिती हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दिली. 
      कोरोनाचे रुग्ण आढळुन आल्याने मागील अठ्ठावीस दिवसांपूर्वी फुरसुंगी गावठाण, हांडेवाडी गावठाण, कुंजीरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील थेऊर फाटा-गाढवेमळा, वाघोली ग्रामपंचायत हद्दीतील केसनंद-जोगेश्वरी रस्ता-सदुगुरु पार्क, भिलारवाडी, खानापुर, मांजरी बुद्रुक हद्दीतील झेड कॉर्नर व कदमवाकवस्ती हद्दीतील कवडीमाळवाडी अशा आठ ठिकाणे कंटेन्मेट झोन (प्रतीबंधीत क्षेत्र) म्हणुन जाहीर केली होती. मात्र वरील आठही ठिकाणचे रुग्ण पूर्णपणे बरे होऊन, घरी परतल्याने शनिवारपासुन वरील आठ ठिकाणचे प्रतिबंधीत क्षेत्र हटविण्यात आले आहे. 
याबाबत अधिक माहिती देतांना सचिन बारवकर म्हणाले, मांजरी बुद्रुक व वाघोली हद्दीत येजा करण्याबाबतची बंदी कायम ठेवल्यास, मांजरी बुद्रुक व वाघोली हद्दीत कायदा व सुव्यवस्थेची परीस्थिती निर्माण होऊ शकतो अशी माहिती हडपसर व लोणीकंद पोलिसांनी दिल्याने, वरील चार गावात ये- जा करण्याबाबत घातलेली तात्काळ उठविण्यात आली आहे. मांजरी बुद्रुक गावात जास्त परिस्थिती स्फोटक बनल्याने, पोलिसांनी वरील विनंती केली होती.

हवेली तालुक्यातील सध्याची सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रे:
मांजरी बुद्रुक (महादेवनगर, गोडबोलेवस्ती, भंडलकरनगर, अनाजी वस्ती, घुले वस्ती, म्हसोबा वस्ती, भापकर मळा, गोपाळपट्टी- टिळेकर कॉलनी), वाघोली (आव्हाळवाडी रोडवरील गणेशनगर, झेड रेसिडेन्सी, गणेशनगर, बायफ रस्ता, धुत कंपनी परीसर, उबाळेनगर), न?्हे (गोकुळनगर, नवदिप सोसायटी ते देवश्री कोम्पलेक्स, कंजारवस्ती कृष्णाईनगर, सिध्दीविनायक अंगण सोसायटी), वाघोली (गणेशपार्क कावडेवाडी), बकोरी (प्रिस्टीन सिटी), मांजरी बुद्रुक (शिवजन्य सोसायटी), कदमवाकवस्ती (स्वामी विवेकानंद नगर, चांदने वस्ती), आंळंदी म्हातोबाची (पानमळा), पिसोळी (गगणनगर), मांजरी खुर्द (पवार वस्ती), कोरेगाव मुळ (गावठाण), होळकरवाडी (झांबरे वस्ती-तुपे प्लॉटींग), कोंढवे-धावडे )खडकबाग एनडीए गेटसमोर) व शिंदेवाडी-जगतापवाडी.
 
 

Web Title: Containment zones removed at eight places in Haveli taluka; permission to Come and go

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.