संविधान अवमान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2021 04:10 AM2021-09-18T04:10:53+5:302021-09-18T04:10:53+5:30
बारामती: भादलवाडी येथील संविधान अवमानप्रकरणी जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. ...
बारामती: भादलवाडी येथील संविधान अवमानप्रकरणी जे जबाबदार आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी रिपब्लिकन सेनेच्यावतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन बारामतीचे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांना देण्यात आले.
रिपब्लिकन सेनेने दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या उपस्थित मंगळवारी (दि. १४) भादलवाडी येथे महावितरणच्या ३३/११ केव्ही उपकेंद्राचे उद्घाटन झाले. यावेळी भेट मिळालेली संविधानाची प्रत पायदळी ठेवल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रवादीचे जबाबदार नेते संविधान पायाजवळ असताना दुर्लक्ष करत असतील तर ही बाब गंभीर आहे. हे एक प्रकारे देशविरोधी व संविधान विरोधी कृत्य केलेले आहे. या कृत्यामुळे सर्वांच्याच भावना दुखावलेल्या आहेत. त्यामुळे सबंधीतांवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी तालुका अध्यक्ष प्रशांत सोनवणे, बारामती शहराध्यक्ष तुषार विजय गायकवाड, युवक अध्यक्ष किशोर महादेव मोरे आदी उपस्थित होते.