पुण्यात रंगणार अखंड घुंगरु नाद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 02:16 PM2018-11-12T14:16:51+5:302018-11-12T14:23:01+5:30

गुरु रोहिणी भाटे यांच्यामध्ये कल्पनाशक्ती,सृजनशीलता व नृत्यनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम होता. त्यांनी कथककलेला भाषा सौंदर्याची जोड दिली.

continue ghunguru sounds programme in Pune | पुण्यात रंगणार अखंड घुंगरु नाद

पुण्यात रंगणार अखंड घुंगरु नाद

Next
ठळक मुद्देरोहिणी भाटे यांना ९४ व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी घुंगरू नाद कार्यक्रम आयोजन १४ व १५ नोव्हेंबर रोजी घुंगरु नाद रंगणार

पुणे : गुरु रोहिणी भाटे यांच्यामध्ये कल्पनाशक्ती,सृजनशीलता व नृत्यनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम होता. त्यांनी कथककलेला भाषा सौंदर्याची जोड दिली आणि कथक सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवत त्याला लोकमान्यता मिळवून दिली. रोहिणी भाटे यांना अखंड घुंगरू नादातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे. नादरूप संस्थेच्या कार्यालयात सलग बारा तास घुंगरू नाद करण्यात येईल. १४ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत कथक गुरु शमा भाटे, मनिषा साठे, भरतनाट्यम नृत्यांगना सुचेता भिडे चापेकर व नादरूप संस्थेतील नृत्यांगना घुंगरू नाद करत आदरांजली वाहतील. 
कथक या नृत्यप्रकारासाठी आयुष्य वेचण्याबरोबरच त्या परंपरेचा धागा जपत कथकमध्ये सर्जनशील प्रयोग करणा-या गुरु रोहिणी भाटे यांना त्यांच्या ९४ व्या जयंतीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यासाठी नादरूप कथक संस्था, महाराष्ट्र कल्चर सेंटर आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्राच्या वतीने बुधवार १४ नोव्हेंबर व १५ नोव्हेंबर रोजी अखंड घुंगरू नाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ नोव्हेंबर रोजी सलग बारा तास घुंगरु नाद रंगणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी हिराबाग चौकातील ज्योत्स्ना भोळे सभागृह येथे सकाळी ९ पासून सायंकाळी ७.३० दरम्यान कथक नृत्याच्या माध्यमातून देशभरातील कथक नर्तक व नृत्यांगना गुरु रोहिणी भाटे यांना आदरांजली देण्यासाठी आपली नृत्यकला सादर करतील. 
या कार्यक्रमात पं. बिरजू महाराज यांची नात आणि कथक नृत्यांगना रागिणी महाराज, जयपूरच्या मनीषा गुलयानी, बंगळूरूच्या कथक नृत्यांगना व नृत्यदिग्दर्शिका मधू नटराज आणि नंदिनी मेहता, जयपूर घराण्याच्या कथक नृत्यांगना विधा लाल, पश्चिम बंगालचे नर्तक अशीमबंधू भट्टाचार्य, सौविक चक्रवर्ती, रायगड घराण्याच्या परंपरेतील अल्पना वाजपेयी याबरोबरच जयपूर घरा गौरी दिवाकर, स्वाती सिन्हा, धीरेंद्र तिवारी आणि मधु नटराज आपली नृत्यसेवा सादर करतील.        

Web Title: continue ghunguru sounds programme in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.