जुलमी पद्धतीने सुरू आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:09 AM2021-03-21T04:09:58+5:302021-03-21T04:09:58+5:30

लासुर्णे : यंदाच्या वर्षी शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना ...

Continues in a tyrannical manner | जुलमी पद्धतीने सुरू आहे

जुलमी पद्धतीने सुरू आहे

Next

लासुर्णे : यंदाच्या वर्षी शेतकरी बांधव कोरोना आणि त्यानंतर झालेल्या तीव्र अतिवृष्टीमुळे आर्थिकदृष्ट्या अगदी कोलमडून गेला आहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देणे आवश्यक असताना राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांची वीज तोडणी मोहीम जुलमी पद्धतीने राबवित आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांचे विजबिल भरले आहे त्यांच्यावर विद्युतरोहित्र बंद करून जाणीवपुर्वक अन्याय करत आहे.

कोरोना, अतिवृष्टी तसेच उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज तोडणीमुळे शेतातील पिके जळून चालली आहेत. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत न पाहता महाआघाडी सरकारने तात्काळ शेतीपंपांचा वीज पुरवठा पूर्ववत करावा. एन उन्हाळ्यात पोटच्या पोरा प्रमाणे जपलेली पिके विज पूरवठा बंद केल्यामुळे डोळ्या देखत जळताना शेतकऱ्यांना बघावे लागत आहे. विज वितरणला शासनाने आदेश दिले आहेत की थकबाकीदारांचे कनेक्शन बंद करा म्हणून परंतू विज वितरण कंपनीने कोणताही अधिकार नसताना ग्राहक हक्क कायद्याविरोधात डायरेक ट्रान्सफॉर्मरच बंद केले आहेत. याचा नाहक त्रास बिलभरलेल्या शेतकऱ्यांना होत आहे. एका ट्रान्सफॉर्मर वर जर विस शेतकरी असले तर यापैकी पाच शेतकऱ्यांचे बिल भरलेले असले तरी त्याला यात भरडले जात आहे. बिल रिडींग नुसार न येता कर्मचारी १००% वसूलीचा तगादा लावत आहेत तसे न केल्यास तात्पुरता चालू केलेला डीपी आठदिवसात परत लगेच बंद केला जात आहे. मौजे बेलवाडी येथी एक ७५ वर्षाचे शेतकरी दोन वेळा ५ हजार रूपये बिल भरून देखील महिनाभरापासून विजवीतरन कंपनीत हेलपाटे मारावे लागत आहेत.

महावितरण अधिकाऱ्यांना विद्युतरोहित्र सोडवण्या संदर्भात वरिष्ठांचे लेखी आदेश नसताना देखील वसूली साठी सर्रास विद्युतरोहित्र सोडवले जात आहेत ते तातडीने न थांबल्यास महावितरण अधिकऱ्यांना काळे फासून कार्यालयात कोंडून ठेवले जाईल असा इशारा पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस गजानन वाकसे यांनी दिला. यावेळी संबधित शेतकऱ्याचा विजपुरवठा चालू करून देण्यात आला व परिसरातील बंद विद्युतरोहित्रचा आढावा घेऊन ते चालू करण्यासाठी सूचना करण्याचे तोंडी आश्वासन वालचंदनगर कार्यालयाचे मुख्य अभियंता सूळ यांनी दिले.

--

चौकट १

अल्पभूधारक भरडला जातोय

--

महावितरण कडून शेतीपंपाची विजजोड तोडणी सुरू आहे. यामुळे काही भागातील बड्या शेतकयांनी तसेच गावपुढाऱ्यांनी राजकीय वजनाचा वापर करीत गावठाणच्या सिंगल फेज विद्युतरोहित्रा वर शेतीपंपाची जोडणी केली आहे. यामध्ये फक्त सर्वसामान्य तसेच अल्पभुधारक शेतकरी भरडला जात आहे. याची सर्व कल्पना महावितरण अधिकाऱ्यांना असताना देखील तेरी- भी चुप अन मेरी-भी चुप असा खेळ सुरू असल्याचे चित्र सध्या इंदापूरच्या पश्चिम भागात पहावयास मिळत आहे.

------------------------

Web Title: Continues in a tyrannical manner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.