पीएमपी अध्यक्षपदाचे सातत्याने ब्रेकडाऊन; १२ वर्षात १५ अध्यक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 07:00 AM2020-01-17T07:00:00+5:302020-01-17T07:00:02+5:30

काही अधिकाऱ्यांनी बदलीसाठी स्वत: प्रयत्न केले तर काही अधिकाऱ्यांची शासनाने बदली केली.

Continuous breakdown of PMP president post; 15 presidents In 12 years | पीएमपी अध्यक्षपदाचे सातत्याने ब्रेकडाऊन; १२ वर्षात १५ अध्यक्ष 

पीएमपी अध्यक्षपदाचे सातत्याने ब्रेकडाऊन; १२ वर्षात १५ अध्यक्ष 

Next
ठळक मुद्देमुंढे यांच्या बदलीसाठी स्थानिक पातळीवरूनही दबाव शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना बळ देणे अपेक्षित कोणतीही संस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अधिक काळ व पुर्णवेळ अधिकारी आवश्यक

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) अध्यक्ष म्हणून कार्यकाळ पुर्ण करणारे अधिकारी न मिळण्याचे शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. सध्याच्या अध्यक्ष नयना गुंडे या कार्यकाळ पुर्ण करतील अशी अपेक्षा असतानाच गुरूवारी त्यांच्या बदलीचे आदेश निघाले. त्यामुळे डॉ. विजय सुर्यवंशी यांच्या रुपाने ‘पीएमपी’ला १२ वर्षातच १६ वे अध्यक्ष मिळणार आहेत. आधी आघाडी नंतर युती आणि आता महाविकास आघाडी सरकारनेही ‘पीएमपी’चे ब्रेकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. 
पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकेची अनुक्रमे पीएमटी व पीसीएमटी ही स्वतंत्र बससेवा एकत्रित करून ‘पीएमपीएमएल’ ही कंपनी २००७ मध्ये स्थापन करण्यात आली. या कंपनीचे प्रमुख म्हणून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक हे पद निर्माण करण्यात आले. या पदावर राज्य शासनाकडून आएएस दर्जाच्या अधिकाºयांची नियुक्ती केली जाते. सुब्बराव पाटील हे पीएमपीचे पहिले अध्यक्ष ठरले. त्यांना जेमतेम १५ महिन्यांचा कालावधी मिळाला. त्यानंतर जानेवारी २०११ पर्यंत चार वर्षात पाच अधिकाºयांची नियुक्ती झाली. दि. ३ जानेवारी २०११ मध्ये पदभार स्वीकारलेले आर. एन. जोशी यांनी आपला तीन वर्षांचा कार्यकाळ पुर्ण केला. आतापर्यंत पीएमपीला मिळालेल्या १५ अध्यक्षांपैकी केवळ जोशी हेच कार्यकाळ पुर्ण करू शकले. तर १५ पैकी आठ अधिकाºयांकडे पीएमपीची अतिरिक्त जबाबदारी सोपविण्यात आली होती. जोशी यांच्यासह केवळ सात अधिकाºयांकडे पीएमपीची पुर्णवेळ जबाबदारी होती. 
डॉ. श्रीकर परदेशी, तुकाराम मुंढे यांच्यासह अन्य काही सक्षम अधिकारी पीएमपीला मिळाले होते. पण काही महिन्यांतच त्यांच्याकडून कार्यभार काढून घेण्यात आला.  काही अधिकाऱ्यांनी बदलीसाठी स्वत: प्रयत्न केले तर काही अधिकाऱ्यांची शासनाने बदली केली. मुंढे यांच्या बदलीसाठी स्थानिक पातळीवरूनही दबाव टाकण्यात आला होता. ‘पीएमपी’ अस्तित्वात आल्यापासून आर्थिक स्थिती फारशी चांगली राहिलेली नाही. खिळखिळ्या बस, घटती प्रवासी संख्या, प्रवासी सुविधांचा अभाव या स्थितीत मागील १२ वर्षात फारसा फरक पडलेला नाही. कोणतीही संस्थेची स्थिती सुधारण्यासाठी अधिक काळ व पुर्णवेळ अधिकारी आवश्यक असतो. पण पीएमपीच्या बाबतीत हे घडताना दिसत नाही. राज्य सरकारकडून दरवेळी पीएमपीला दुर्लक्षित केले आहे. शहराची सार्वजनिक वाहतुक व्यवस्था सुधारण्यासाठी अधिकाऱ्यांना बळ देणे अपेक्षित असताना सतत दुजाभाव करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. 
----------
२००७ पासूनचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक
        अधिकारी                                                                        कार्यकाळ
१)     सुब्बराव पाटील                                           दि. २६ ऑगस्ट २००७ ते ५ नोव्हेंबर २००८
२)     अश्विनीकुमार                                             दि. ५ नोव्हेंबर २००८ ते ८ फेब्रुवारी २००९
३)     नितीन खाडे                                                  दि. ९ फेब्रुवारी २००९ ते २४ ऑगस्ट २००९
४)     महेश झगडे (अतिरिक्त पदभार)                  दि. २५ ऑगस्ट २००९ ते ७ सप्टेंबर २००९
५)     शिरीष कारले (अतिरिक्त पदभार)                दि. ७ सप्टेंबर २००९ ते २३ फेब्रुवारी २०१०
६)     दिलीप बंड (अतिरिक्त पदभार)                   दि. २३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११
७)     आर. एन. जोशी                                          दि. ३ जानेवारी २०११ ते ३१ ऑक्टोबर २०१४
८)     आर. आर. जाधव (अतिरिक्त पदभार)        दि. १ नोव्हेंबर २०१४ ते १२ डिसेंबर २०१४
९)     श्रीकर परदेशी (अतिरिक्त पदभार)              दि. १२ डिसेंबर २०१४ ते ७ एप्रिल २०१५
१०)    ओमप्रकाश बकोरिया (अतिरिक्त पदभार)  दि. ७ एप्रिल २०१५ ते ३० मे २०१५
११)     कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार)            दि. ३० मे २०१५ ते ६ जून २०१५
१२)     अभिषेक कृष्णा                                         दि. ८ जून २०१५ ते ८ जुलै २०१६
१३)     कुणाल कुमार (अतिरिक्त पदभार)          दि. ८ जुलै २०१६ ते २९ मार्च २०१७
१४)     तुकाराम मुंढे                दि. २९ मार्च २०१७ ते ८ फेबु्रवारी २०१८
१५)     नयना गुंडे                    दि. १२ फेब्रुवारी २०१८  
--------------------------------

Web Title: Continuous breakdown of PMP president post; 15 presidents In 12 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.