रेखाचित्र प्रशिक्षणासाठी सीआयडी -भारती विद्यापीठात सामंजस्य करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 09:38 PM2021-06-22T21:38:23+5:302021-06-22T21:39:03+5:30

डॉ. गिरीश चरवड हे गेली २८ वर्षांपासून पोलिसांना रेखाचित्र विनामोबदला काढून देण्याचे काम करीत आहेत.

Contract between CID and Bharati University for Drawing Training | रेखाचित्र प्रशिक्षणासाठी सीआयडी -भारती विद्यापीठात सामंजस्य करार

रेखाचित्र प्रशिक्षणासाठी सीआयडी -भारती विद्यापीठात सामंजस्य करार

Next

पुणे : गुन्ह्यातील संशयित आरोपींची ओळख पटवून त्यांना अटक करण्यासाठी महत्वाचे गुन्ह्यांमध्ये पोलिसांनी आवश्यक असलेले रेखाचित्र प्रशिक्षणासाठी डॉ. गिरीश चरवड यांनी उपलब्ध करुन देणे व आवश्यकतेप्रमाणे रेखाचित्र काढून देण्याकरीता गुन्हे अन्वेषण विभाग व भारती विद्यापीठ यांच्यात मंगळवारी सामंजस्य करार करण्यात आला. कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीव कदम यांच्या निर्देशानुसार हा करार करण्यात आला आहे.

या कार्यक्रमाला भारती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. माणिकराव साळुंखे, सीआयडीचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीखक मकरंद रानडे, पोलीस अधीक्षक संभाजी कदम, पोलीस उपअधीक्षक अनुजा देशमाने, समन्वयक पोलीस निरीक्षक अमोल गवळी, भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव, डॉ. महादेव सगरे, रजिस्ट्रार जे जयकुमार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी हनुमंत मुळावडे, भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फाईन आर्टचे प्राचार्य अनुपमा पाटील, प्रा. डॉ. गिरीश चरवड उपस्थित होते.

डॉ. गिरीश चरवड हे गेली २८ वर्षांपासून पोलिसांना रेखाचित्र विनामोबदला काढून देण्याचे काम करीत आहेत. त्यांची भारती विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नेमणूक करण्यात आली आहे़ गुन्हे अन्वेषण विभागाने रेखाचित्र कक्षाची स्थापना केली आहे. त्याअंतर्गत १८ पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्या पहिल्या तुकडीचे गोपनीय प्रशिक्षण पूर्ण करुन त्यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Web Title: Contract between CID and Bharati University for Drawing Training

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.