बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांच्या हक्क मिळवून देण्याबाबतचे योगदान अविस्मरणीय - नीलम गोऱ्हे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 11:15 PM2018-02-05T23:15:09+5:302018-02-05T23:52:41+5:30

समाजाला अस्थिर करणाऱ्या अनेक शक्ती आपल्या आसपास आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून सर्व समाजाने एकत्र आले पाहजे, असे मत शिवसेना प्रतोद, उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.

Contributing to Babasaheb Ambedkar's rights to women is unforgettable - Nilam Gorhe | बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांच्या हक्क मिळवून देण्याबाबतचे योगदान अविस्मरणीय - नीलम गोऱ्हे

बाबासाहेब आंबेडकरांचे महिलांच्या हक्क मिळवून देण्याबाबतचे योगदान अविस्मरणीय - नीलम गोऱ्हे

Next

  पुणे  -    समाजाला अस्थिर करणाऱ्या अनेक शक्ती आपल्या आसपास आहेत. कोरेगाव भीमा येथे झालेल्या घटना अत्यंत दुर्दैवी आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, म्हणून सर्व समाजाने एकत्र आले पाहजे, असे मत शिवसेना प्रतोद, उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले.
महामाता रमामाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीतर्फे रमाई आंबेडकर यांच्या १२१ व्या जयंतीनिमित्त रमाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त समितीतर्फे ‘सन्मान रमाईच्या लेकरांचा उपक्रमाअंतर्गत शिवसेनेच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या आ.डॉ.नीलम गोऱ्हे यांचा माजी आ. उल्हास पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्कार प्रसंगी बोलताना आ.डॉ.गोऱ्हे म्हणाल्या की, दलितांनी धर्मांतर केले असले तरी त्यांनी राष्ट्रांतर केले नाही. ते भारतीयच असल्याने त्यांच्याशी रक्ताचे नाते कायम आहे. जातीचा विचार करणाऱ्या अदृश्य हातांमुळे होणारे दृश्य राजकारण आता सर्वांच्या लक्षात येऊ लागले आहे. रमामाई आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यासाठी राष्ट्रपतींना निमंत्रण देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आ.डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले. स्मारकाच्या विकासकामासाठी स्थनिक आमदार निधीतून 5 लक्ष देण्याची घोषणा केली तसेच जास्त निधीची आवशक्यता भासल्यास अर्थमंत्री यांच्या कडे याबाबत बैठक घेऊन निधी मंजूर करून घेऊ असे आश्वासन देखील गोऱ्हे यांनी यावेळी दिले.
उल्हास पवार म्हणाले जाती अंतीची चर्चा करणारी माणसे करणारी माणसे जाती आणखी घट्ट करण्याचे काम करीत आहेत. महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे यांना अपेक्षित जातीअंताच्या लढाईसाठी प्रयत्न व्हावेत, महामानवांची तुलना करण्यापेक्षा त्यांच्या विचारांप्रमाणे आचरण केले जावे.
यावेळी जेष्ठ आंबेडकरी कार्यकर्ते मुरलीधर जाधव, नगरसेविका पल्लवी जावळे, लता राजगुरू, लता धयारकर, शिवसनेचे सहसंपर्कप्रमुख अजय भोसले, प्रशांत बधे, समन्वयक संजय मोरे, सुदर्शना त्रिगुनाईत, अमृत पठारे, डॉ.अमोल देवळेकर, एकनाथ ढोले, कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक विठ्ठल गायकवाड, संयोजक उमेश चव्हाण हे उपस्थित होते. पल्लवी जावळे, वैशाली चांदणे यांनी मनोगत व्यक्त केले तर, प्रास्ताविक डॉ.अमोल देवळेकर यांनी केले

Web Title: Contributing to Babasaheb Ambedkar's rights to women is unforgettable - Nilam Gorhe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.