स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसचे योगदान अमूल्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:15 AM2021-08-17T04:15:18+5:302021-08-17T04:15:18+5:30
पुणे : स्वातंत्र्य चळवळ व काँग्रेस वेगळे करता येणे अशक्य आहे. हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक काँग्रेस ...
पुणे : स्वातंत्र्य चळवळ व काँग्रेस वेगळे करता येणे अशक्य आहे. हा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे हे प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याचे कर्तव्य असल्याचे काँग्रेस शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनाचे काँग्रेस भवनातील ध्वजारोहण बागवे यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे वारसदार सरस्वती मराठे, अन्नपूर्णा वाघ, हरिहर नाबर, मुकुंदराव नगरकर यांचे पुत्र संजय, सीताबाई चोरगे यांचे पुत्र किशोर, शशिकला क्षीरसागर यांचे नातू चैतन्य क्षीरसागर, नरसिंह राघवेंद्र मळगे यांच्या कन्या माया मठकर व महेश्वरी पुराणिक, जगन्नाथ पाटसकर यांचे पुत्र प्रदीप व कन्या वंदना पाटसकर, उद्धवराव इंगवले यांचे पुत्र भारत, विठ्ठल भल्ला यांचे नातू आनंद खन्ना, सुवालाल व मीनाबाई यांचे पुत्र ॲड. अनिल यांना ज्येष्ठ नेते आमदार उल्हास पवार यांच्या हस्ते गौरविण्यात आले. आमदार शरद रणपिसे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी, ॲड. अभय छाजेड, दीप्ती चवधरी, कमल व्यवहारे, सरचिटणीस रमेश अय्यर, नीता रजपूत, संगीता तिवारी आदी या वेळी उपस्थित होते.