कोरोनाच्या काळात परिचारिका यांचे योगदान मोलाचे : परीट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:10 AM2021-05-13T04:10:59+5:302021-05-13T04:10:59+5:30
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका यांना इंदापूर पंचायत समितीच्यावतीने परिचारिका दिनाचे औचित्य साधून, बुधवारी (दि.१२) फळे वाटप केले. त्यावेळी ...
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका यांना इंदापूर पंचायत समितीच्यावतीने परिचारिका दिनाचे औचित्य साधून, बुधवारी (दि.१२) फळे वाटप केले. त्यावेळी परीट बोलत होते. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. एकनाथ चंदनशिवे, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत महाजन, ग्रामसेवक सचिन पवार, ग्रामसेवक आबासाहेब जगताप, ग्रामसेवक भारत मारकड उपस्थित होते.
यावेळी गटविकास अधिकाऱ्यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांशी संवाद साधून त्यांच्या आरोग्याची विचारपूस केली. त्याचबरोबर उपस्थित असणाऱ्या सर्व महिला परिचारिका यांना भविष्यात काही गरज भासल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधल्यास त्यांना शासनाच्या वतीने सर्वोतोपरी मदत करण्यात येईल, अशी ग्वाही गटविकास अधिकारी विजयकुमार परीट यांनी दिली.
१२ इंदापूर
इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका यांना फळे वाटप करताना विजयकुमार परीट.