हिंदू जनगर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य; बारामतीत कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 04:40 PM2023-04-27T16:40:24+5:302023-04-27T16:40:53+5:30

पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडील आदेशानुसार जमावबंदी लागू असल्याने अटीचे उल्लंघन करू नये, अशी नोटीस दिली होती

Controversial statements that will cause religious discord Case filed against Kalicharan Maharaj in Baramati | हिंदू जनगर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य; बारामतीत कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

हिंदू जनगर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य; बारामतीत कालीचरण महाराजांविरोधात गुन्हा दाखल

googlenewsNext

बारामती : बारामती शहरात  ९ फेब्रुवारी रोजी आयोजित हिंदू जनगर्जना मोर्चात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी कालीचरण महाराज उर्फ अभिजित धनंजय सराग (रा. अकोला) व मोर्चा आयोजक विकास महादेव देवकाते (रा. बांदलवाडी, ता. बारामती) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भादंवि कलम १५३ अ तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी अतुल जाधव यांनी याबाबत २५ एप्रिल रोजी फिर्याद दिली आहे. फियार्दीत नमूद केल्यानुसार, बारामतीत ९ फेब्रुवारी रोजी हिंदू गर्जना मोर्चा पार पडला. या मोर्चाची व्हिडीओ क्लिप पोलिसांनी बारकाईने बघितली असता त्यामध्ये जातीय तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केल्याचे निदर्शनास आले. वास्तविक मोचार्पूर्वी देवकाते यांना पोलिसांनी जिल्हाधिकाऱ्यांकडील आदेशानुसार जमावबंदी लागू असल्याने अटीचे उल्लंघन करू नये, अशी नोटीस दिली होती.  शहरातील तीन हत्ती चौकात मोर्चाचा समारोप झाला. तेथे कालिचरण महाराज यांनी धार्मिक तेढ निर्माण होईल वादग्रस्त वक्तव्ये करत अफवा पसवण्याचा प्रयत्न केला. आयोजक देवकाते यांनी नोटीस स्विकारल्यानंतरहि  त्याचे उल्लंघन केले असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Controversial statements that will cause religious discord Case filed against Kalicharan Maharaj in Baramati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.