मेट्रोच्या विषयावरून भाजपामध्ये मतभेद
By admin | Published: December 7, 2014 12:20 AM2014-12-07T00:20:21+5:302014-12-07T00:20:21+5:30
मेट्रो ‘जमिनीवरूनच’ व्हावी, असे स्पष्ट मत नूतन अन्नधान्य पुरवठा आणि संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे.
Next
पुणो : मेट्रो ‘जमिनीवरूनच’ व्हावी, असे स्पष्ट मत नूतन अन्नधान्य पुरवठा आणि संसदीय कामकाजमंत्री गिरीश बापट यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे मेट्रोवरून सुरू झालेल्या वादात बापट आणि खासदार अनिल शिरोळे यांच्यामध्येच मतभेद असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वसाधारण सभेने सर्व प्रक्रिया पार पाडून मंजूर केलेल्या जमिनीवरील (इलिव्हेटेड) मेट्रोचा प्रस्तावच योग्य असून, त्याप्रमाणोच शहरात मेट्रो होईल, असे सांगत प्रस्ताव अंतिम टप्प्यात असताना भुयारी मेट्रोचा आग्रह धरणा:या शिरोळे यांना घरचा आहेर दिला आहे.
शुक्रवारी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर गिरीश बापट यांचे आज पुण्यात आगमन झाले. त्यानंतर ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (प्रतिनिधी)