पुण्यात गणपतीची वर्गणी मागण्यावरून वाद; कुऱ्हाडीने हल्ला करून व्यावसायिकाला केले गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2022 04:30 PM2022-09-01T16:30:40+5:302022-09-01T16:30:55+5:30

व्यावसायिकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू

Controversy in Pune over demand for subscription of Ganesha businessman was seriously injured after being attacked with an ax and a stone | पुण्यात गणपतीची वर्गणी मागण्यावरून वाद; कुऱ्हाडीने हल्ला करून व्यावसायिकाला केले गंभीर जखमी

पुण्यात गणपतीची वर्गणी मागण्यावरून वाद; कुऱ्हाडीने हल्ला करून व्यावसायिकाला केले गंभीर जखमी

googlenewsNext

शिवणे : उत्तमनगर पोलीस हद्दीत असलेल्या अहिरे गेट येथे एका बांधकाम व्यावसायिकावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. गणपतीची वर्गणी मागण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून कुऱ्हाड आणि दगडाने हल्ला करून व्यावसायिकाला गंभीर जखमी केले आहे.  चंद्रकांत रामकृष्ण मोरे (वय ४४ वर्षे) असे त्या व्यावसायिकाचे नाव आहे. जीवन सुरेश पवार आणि दर्शन रमेश पवार या दोघांना अटक करण्यात आली आहे.  
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  दिनांक ३०/०८/२०२२ रोजी गणपतीची वर्गणी मागण्यावरून जीवन सुरेश पवार (वय २० वर्ष) आणि दर्शन रमेश पवार यांची चंद्रकांत रामचंद्र मोरे यांच्या बरोबर वाद झाला. त्याचा राग मनात धरून दोन्ही आरोपींनी दिनांक १/०९/२०२२ रोजी सकाळी १०.१० वाजता मोरया रेसिडन्सी शिवणे येथे असलेल्या फिर्यादीच्या ऑफिसमध्ये गेले. त्यांच्या डोक्यात कुऱ्हाड तसेच दगडाने घाव घालून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ह्या घटनेमध्ये चंद्रकांत मोरे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस आयुक्त रुक्मिणी गलांडे आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुढील तपास पोलीस निरीक्षक अर्जुन बोत्रे करत आहेत.

Web Title: Controversy in Pune over demand for subscription of Ganesha businessman was seriously injured after being attacked with an ax and a stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.