एल्गार परिषद वाद : शरजिल उस्मानीला म्हणायचे होते मनूवादी, बी जे कोळसे पाटील यांनी मागितली माफी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2021 04:18 PM2021-02-03T16:18:30+5:302021-02-03T16:20:19+5:30
एल्गार परिषदेचे पुण्यात शनिवारी ३० जानेवारी रोजी आयोजन केले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शरजिल उस्मानी यांचे भाषण झाले होते. त्यात त्याने हिंदूंविषयी आपत्तीजनक व भडकावू विधाने केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुणे : शरजिल उस्मानी याला मनुवादी म्हणायचे होते, त्याऐवजी त्याने हिंदू शब्द प्रयोग केला. यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असे निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांनी म्हटले आहे.
एल्गार परिषदेचे पुण्यात शनिवारी ३० जानेवारी रोजी आयोजन करण्यात आले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजिल उस्मानीचे भाषण झाले होते. त्यात त्याने हिंदू धर्माविषयी आपत्तीजनक व भडकावू विधाने केल्याने पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
एल्गार परिषदेचे आयोजन निवृत्त न्यायमूर्ती बी. जे. कोळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. याबाबत कोळसे पाटील यांनी सांगितले की, एल्गार परिषद ही मनुवाद, मनीवादाच्या विरोधात संघर्ष करीत आलेली आहे. अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य हे राजकारणाचे प्रमुख मुद्दे व्हावेत. धार्मिक, मंदिराबाबतचे मुद्द्यांवर राजकारण करु नये, असे म्हणणे आहे. सामान्य माणसाच्या गरजेचे प्रश्न राजकारणात प्रमुख स्थानी यावेत, अशी आमची भूमिका आहे.
एल्गार परिषदेत हिंदूंबाबत आक्षेपार्ह विधान, शरजिल उस्मानीविरोधात गुन्हा दाखल
शरजिल उस्मानी या २३ वर्षाच्या तरुणाचे संपूर्ण भाषण ऐकावे. आम्ही आजवर ब्राम्हण्यवादाविरोधात संघर्ष करीत आलो आहे. तामिळनाडुतील ब्राम्हणवादाविरोधातील लढाई उस्मानी याला माहिती नाही. तो शब्दाचा वापर करताना चुकला. त्याला मनूवादी म्हणायचे होते. त्याचे भाषण सुरु असताना आपल्याला हे लक्षात आले नाही. नाही तर तेव्हाच आपण त्या शब्दावर आक्षेप घेतला असता. गेले चार दिवस आमची बदनामी सुरु आहे. तेव्हा आपण गप्प बसलो होतो.
एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी शरजिल उस्मानी याच्यावर गुन्हा दाखल करा
सर्वोच्च न्यायालयानेही हिंदू हा धर्म नाही तर आचरणपद्धती असल्याचे म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबडेकर, महात्मा ज्योतिबा फुले यांनी विविध पुस्तकांमधून त्यांची हिंदू धर्माविषयी जे काही म्हटले आहे. त्यावर आपली जाहीर चर्चा करायची तयारी आहे. उस्मानी याच्या वक्तव्यावरून कोण भडकविण्याचा प्रयत्न करीत आहे, असा प्रश्न कोळसे पाटील यांनी उपस्थित केला.
एल्गार परिषदेतील वादग्रस्त वक्तव्याची चौकशी करायलाच हवी: जितेंद्र आव्हाड