मेट्रो की शिवसृष्टी वाद पुन्हा पेटणार

By admin | Published: October 2, 2015 01:10 AM2015-10-02T01:10:17+5:302015-10-02T01:10:17+5:30

वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असला, तरी या मार्गावरचा मेट्रो डेपो आणि पहिल्या क्रमांचे स्टेशन कोठे होणार, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

The controversy over the Metro's Shivsrishna arose again | मेट्रो की शिवसृष्टी वाद पुन्हा पेटणार

मेट्रो की शिवसृष्टी वाद पुन्हा पेटणार

Next

पुणे : वनाज ते रामवाडी हा मेट्रो मार्ग मान्यतेच्या अंतिम टप्प्यात असला, तरी या मार्गावरचा मेट्रो डेपो आणि पहिल्या क्रमांचे स्टेशन कोठे होणार, हे अजूनही गुलदस्त्यातच आहे. शहराच्या जुन्या हद्दीचा सुधारित प्रारूप विकास आराखडा (डीपी) अंतिम करण्यासाठी नेमलेल्या शासन नियुक्त समितीने मेट्रोसाठी दिल्ली मेट्र रेल कॉर्पोरेशन (डीएमआरसी) ने सुचविलेल्या २७ एकर जागेवर मेट्रोसाठीचे आरक्षण न सुचविता पब्लिक सेमी पब्लिक आरक्षण सुचविले आहे. त्यामुळे या जागेवर पुन्हा एकदा मेट्रो का शिवसृष्टी हा तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे आता या समितीच्या विकास नियंत्रण नियमावलीकडे लक्ष लागले असून, या नियमावतील मेट्रोसाठीचे बदल न झाल्यास हा प्रकल्पच अडचणीत येण्याची शक्यता आहे. निर्णय महापालिकेला घ्यावा लागणार आहे.
डीएमआरसीने वनाज ते रामवाडी या मेट्रोमार्गाच्या अहवालात कोथरूड येथील जुन्या कचराडेपोच्या सुमारे २७ एकर जागेवर या मार्गावरील पहिले स्टेशन, तसेच मेट्रोचा डेपो सुचविला होता. मात्र, या ठिकाणी शिवसृष्टी करण्याची मागणी झाली होती. तसेच त्याबाबतचा ठरावही मुख्यसभेत करण्यात आला होता. त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली होती. दरम्यानच्या कालावधीत महापालिका प्रशासनाकडून शहराचा सुधारित डीपी तयार करत असताना, या वादावर पडदा टाकण्यासाठी प्रशासनाकडून या जागेवर मेट्रो अथवा शिवसृष्टीचे आरक्षण न दाखविता सिव्हीक सेंटरचे आरक्षण दाखविले. तसेच विकास नियमावलीत सिव्हीक सेंटरमध्ये मेट्रो स्टेशन उभारण्याची तरतूद प्रस्तावित केली होती. तसेच शिवसृष्टीसाठी बीडीपीमधील १०० एकर जागा देण्याची मागणी राज्य शासनाकडे केली होती. मात्र, मार्च २०१५ मध्ये महापालिकेने डीपी करण्यास उशीर केल्याने राज्य शासनाने हा डीपी ताब्यात घेतला असून, त्यासाठी विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीने आपला डीपी नुकताच सादर केला आहे. मात्र, त्यात महापालिकेने कचरा डेपोच्या ठिकाणी सुचविलेले सिव्हीक सेंटरचे आरक्षण बदलून ते पब्लिक सेमी पब्लिक केले आहे. प्रत्यक्षात या डीपीमध्ये या समितीकडून मेट्रो मार्ग आणि इतर स्टेशन दाखविण्यात आली असली, तरी वनाज ते रामवाडी मार्गावरील पहिल्या क्रमांकाचे स्टेशन आणि डेपोही दाखविलेला नाही.
एकीकडे मागील महिन्यात मेट्रोसाठी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: बैठक घेऊन या मार्गास मान्यता दिली आहे. त्यात काही प्राथमिक बदल करण्यात येणार असले, तरी प्रकल्पास उशीर होणार नाही, याची खबरदारी घेण्याच्या सूचना राज्य शासन, तसेच महापालिकेस दिल्या आहेत. असे असताना आता पुन्हा एकदा क्रमांक १ चे स्टेशन आणि डेपोबाबत घोळ निर्माण झाला असल्याने मेट्रोचे घोडे पुन्हा अडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
डीपीमध्ये समितीकडून मेट्रो मार्ग आणि इतर स्टेशन दाखविली असली, तरी वनाज ते रामवाडी मार्गावरील पहिल्या क्रमांकाचे स्टेशन आणि डेपोही दाखविलेला नाही. तर शिवसृष्टीबाबतही स्पष्टता नाही. त्यामुळे या जागी नेमके काय होणार, याचा वाद ऐन मेट्रोच्या मान्यतेवेळी वाढणार आहे.

Web Title: The controversy over the Metro's Shivsrishna arose again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.