माळेगावला मतदान केंद्रावर वाद, धक्काबुक्की
By admin | Published: February 22, 2017 02:28 AM2017-02-22T02:28:27+5:302017-02-22T02:28:27+5:30
माळेगाव (ता. बारामती) येथील श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील मतदान केंद्रावर मतदान
बारामती : माळेगाव (ता. बारामती) येथील श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथील मतदान केंद्रावर मतदान प्रतिनिधीवरून वाद झाला. राष्ट्रवादी काँग्रेस-भाजपाच्या गटामध्ये शाब्दिक वादाचे रूपांतर धक्काबुक्कीमध्ये झाल्याचे चित्र होते. या वादामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. या घटनेच्या पार्श्वभूमीवर माळेगावमध्ये मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस कर्मचाऱ्यांचा मोठा बंदोबस्त मतदान केंंद्रावर होता. मतदान केंद्राबाहेर मोठी गर्दी होती. याबाबत सहायक पोलीस निरीक्षक छबू बेरड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले, की एकमेकांचे मतदान प्रतिनिधी आतबाहेर करण्यावरून वाद झाला. समझोता केल्याने वाद मिटला; अन्यथा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता होती. या घटनेनंतर पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त वाढविला.
माळेगाव (ता. बारामती) येथील श्रीमंत शंभुसिंह महाराज हायस्कूल व ज्यनिअर कॉलेज येथील मतदान केंद्रावर ७ बूथ आहेत. त्यामुळे मतदारांची मोठी गर्दी होते. भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी या मतदान केंद्राची विभागणी करण्यात येणार आहे. याबाबत अहवाल पाठविण्यात येणार असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले.